एम. ए.च्या इंग्रजी विषयाच्या द्वितीय सत्राच्या जुन्याच अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रावर देण्यात आल्याने विद्यार्थी चाटच पडले. या प्रकारामुळे पुन्हा एकदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा बेजबाबदार कारभार चव्हाटय़ावर आला.
शुक्रवारी एम. ए.च्या विद्यार्थ्यांचा इंग्रजी विषयाचा द्वितीय सत्राचा पेपर होता. या वेळी विद्यापीठाने नवीन अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रावर न पाठवता जुन्या अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका पाठवून दिल्या. सर्वच केंद्रांत हा प्रकार घडला. जालन्यातल्या मत्स्योदरी महाविद्यालयातल्या परीक्षा केंद्रावर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकारामुळे गोंधळलेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षा नियंत्रकांना या प्रकाराची माहिती दिली. त्यामुळे महाविद्यालयाने विद्यापीठाशी संपर्क साधून नवीन अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका पाठवण्याची मागणी केली. यानंतर तब्बल दीड तासाने विद्यापीठाने नवीन ऑनलाइन प्रश्नपत्रिका पाठवली. दरम्यान, या धामधुमीत बराच उशीर झाल्याने प्रश्नपत्रिका सोडवण्यास परीक्षार्थीना वेळ वाढवून देण्यात आली. या प्रकाराचा विद्यार्थी आणि पालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. विद्यापीठ परिसरात या घटनेचा निषेध केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा