अलिबाग – वनविभागाच्या पुढाकाराने रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर आणि दिवेआगर समुद्र किनाऱ्यांवर सागरी कासव संवर्धन मोहीम सुरू करण्यात आली आहे. सामाजिक संस्था आणि स्थानिकांच्या सहाकार्यातून सुरू झालेल्या या मोहिमेला आता चांगले यश मिळत आहे. गेल्या दोन दिवसांत हरिहरेश्वर समुद्रकिनाऱ्यावर शंभरहून अधिक कासवांची पिल्ले समुद्रात सुखरूप सोडण्यात यश आले आहे.

भारतीय उपखंडात चार ते पाच प्रकारच्या सागरी कासवांचा वावर दिसून येतो. यात प्रामुख्याने ऑलिव्ह रिडले, ग्रीन टर्टल, हॉक्स बिल टर्टल आणि लेदर बॅक टर्टल या चार प्रकारच्या सागरी कासवांच्या प्रजातीचा समावेश आहे. कोकण किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले आणि ग्रीन टर्टल या दोन प्रकारच्या सागरी कासवांचे अस्तित्व दिसून येते. मात्र गेल्या काही वर्षांपासून विविध कारणांमुळे या कासवांचे अस्तित्व धोक्यात आले होते.

Farmers in Washim district are cultivating chia crop along with traditional crops
वाशीम जिल्ह्यात पीक लागवडीच्या नव्या वाटा; ‘या’ पिकाला मिळतोय चांगला भाव
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
tur dal price , tur dal price sangli , tur dal,
तूरडाळ सामान्यांच्या आवाक्यात !
farmer cabbage farm destroyed
कोल्हापूर : दर घसरल्याने शेतकऱ्याने कोबीवर ट्रॅक्टर फिरवला
monolith monuments found in kumbhavade village,
राजापूरातील कुंभवडे येथे जांभ्या दगडात आढळली सात एकाश्मस्तंभ स्मारके
seahorses sindhudurg loksatta news
समुद्री घोड्यांच्या संवर्धन, प्रजनन प्रकल्पासाठी सिंधुदुर्गची निवड
shree Kopineshwar Mandir trust
एक धाव देशासाठी….युवा दौड संपन्न, रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीकौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासचा उपक्रम
Raigad district administration will implement bamboo cluster scheme planting 35 lakh bamboos
रायगडात ३५ लाख बांबूची लागवड होणार

हेही वाचा – Ambedkar Jayanti 2023 ‘डॉक्टर’ बाबासाहेब आणि सार्वजनिक आरोग्य!

किनारपट्टीवरील भागात वाढणारे प्रदूषण, मासेमारी जाळ्यात अडकून होणारा कासवांचा मृत्यू, कासवांची तस्करी आणि अंडी खाल्ल्यामुळे कासवांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. ही बाब लक्षात घेऊन वन विभाग, सामाजिक संस्था आणि स्थानिकांच्या मदतीने किनारपट्टीवर कासव संवर्धन मोहीम हाती घेण्यात आली.

याचाच एक भाग म्हणून यावर्षी रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर आणि दिवेआगर समुद्र किनाऱ्यांवर सागरी कासव संवर्धन मोहीम राबविण्यात आली. रोहा वनविभागाच्या पुढाकाराने, हरिहरेश्वर पर्यटन विकास संस्था आणि स्थानिकांच्या मदतीने हरिहरेश्वर समुद्र किनारी ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या सागरी कासवांची अंडी संवर्धन करून ठेवण्यात आली आहे. दिड महिन्यानंतर यातून कासवांची पिल्ले बाहेर पडण्यास सुरवात झाली. बुधवारी आणि गुरुवारी यातून शंभरहून अधिक कासवांची पिल्ले बाहेर पडली आहेत. त्यांना सुरक्षितपणे समुद्रात सोडण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत उर्वरीत अंड्यांमधून पिल्ले बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे.

हेही वाचा – वर्धा : ग्रंथालये होणार सक्षम; अर्धवेळ ग्रंथपाल आता पूर्णवेळ

संवर्धन कसे होते?

साधारणपणे डिसेंबर ते एप्रिल या कालावधीत कासव किनारपट्टीवर येऊन अंडी घालतात. एका वेळी शंभर ते दिडशे अंडी घातली जातात. यातून पंचेचाळीस ते पासष्ट दिवसांनी पिल्लं बाहेर येण्यास सुरवात होते. तोवर या अंड्यांचे संवर्धन करणे गरजेचे असते. अन्यथा अंडी नष्ट होण्याची भिती असते. त्यामुळे किनाऱ्यावर जाळी लावून तयार केलेल्या संरक्षित क्षेत्रात अंड्यांची जपणूक केली जाते. अंड्यातून पिल्ले बाहेर आली की ती तातडीने समुद्रात सोडली जातात. अन्यथा पिल्ले दगावू शकतात.

वनविभागाने सुरू केलेल्या या कासव संवर्धन मोहिमेला आता स्थानिकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळण्यास सुरवात झाली आहे. कासव संवर्धनासाठी आता सामाजिक संस्थाही पुढे येत आहेत. कासवांची अंडी संकलित करून ती संरक्षित केलेल्या ठिकाणी आणून देत आहेत. या मोहिमेतून दिवेआगर येथे यावर्षी तीनशे ते चारशे कासवांच्या पिल्लांना समुद्रात सोडण्यात येणार आहे, असे श्रीवर्धन, वनक्षेत्र अधिकारी, मिलिंद राऊत म्हणाले.

हेही वाचा – “मंगल प्रभात लोढांनी फार लोड घेऊ नये” ‘त्या’ निर्णयावरून सुषमा अंधारेंनी सुनावलं

दरवर्षी हरिहरेश्वर समुद्र किनाऱ्यावर कासव संवर्धन प्रकल्प राबविला जातो. अंड्यातून बाहेर पडलेल्या कासवांचा समुद्रपर्यंतचा प्रवास पाहणे हा एक विलक्षण अनुभव असतो. स्थानिकांमध्येही कासव संवर्धनाबाबत चांगली जागृती निर्माण झाली असून येणाऱ्या पर्यटकांना या प्रकल्पाची माहिती आवर्जून दिली जात असते, असे हरिहरेश्वर पर्यटन विकास संस्था, सचिव, सिद्धेश पोवार यांनी सांगितले.

Story img Loader