धाराशिव : उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. तर आजवर तेवीस जणांनी ५९ उमेदवारी अर्ज खरेदी केले आहेत. एकमेकांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या उबाठा गटाचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्चना राणाजगजितसिंह पाटील या दोघांनी प्रत्येकी चार उमेदवारी अर्जाची खरेदी केली आहे. तर खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या पत्नी संयोजिनी राजेनिंबाळकर यांनी स्वतःच्या उमेदवारीसाठी चार उमेदवारी अर्ज खरेदी केले आहेत. आजवर ४१ जणांनी ९५ उमेदवारी अर्जाची खरेदी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी १२ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे. उमेदवारी दाखल करण्यासाठी १९ एप्रिल ही अंतिम तारीख असून २० एप्रिल रोजी छाननी तर २२ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. चौथ्या दिवशी लोकसभा निवडणूक लढवू इच्छिणार्‍या तीन अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. यात मागील निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहिलेले अर्जून सलगर यांच्यासह दोन उमेदवारांचा समावेश आहे.

आणखी वाचा-जतचे माजी आ. जगताप यांचा भाजपचा राजीनामा, विशाल पाटलांचा प्रचार करणार

या व्यतिरिक्त सोमवार, १५ एप्रिल रोजी तेवीस उमेदवारांनी ५९ उमेदवारी अर्जांची खरेदी केली आहे. यात विद्यमान खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यासह महायुतीच्या उमेदवार अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह खासदारपत्नी संयोजिनी ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचाही समावेश आहे. या तिघांनीही प्रत्येकी चार उमेदवारी अर्ज आपल्या निवडणूक प्रतिनिधीमार्फत खरेदी केले आहेत. आज शिवसेनेचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यानंतर जनसभेचे आयोजन करण्यात आले असून माजी मंत्री आदित्य ठाकरे, अमित देशमुख, आमदार रोहित पवार यांची उपस्थिती राहणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Omraje nimabalkar archana patil sanyojini raje nimbalkar have purchased nomination papers mrj