तुळजापूर येथे दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघनमध्ये देवीच्या मिरवणुकीत कर्जत येथील माय मुहूर्ताब देवी यांच्या काठीला अग्रस्थान असते. आज या काठ्यांचे पाचव्या माळेच्या दिवशी तुळजापूरकडे प्रस्थान झाले. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

कर्जत येथील माय मुहूर्ताब देवी हे एक प्रसिद्ध व जागृत देवस्थान आहे. ४०० वर्षांपूर्वी गेनुजी तेली यांच्या घरी एक छोटी मुलगी आली. अनेक वर्षे ती त्यांच्या घरी राहिली. तिची चौकशी करण्यासाठी कोणीही आले नाही. गेनुजी तेल यांनी तिचा मुलीप्रमाणे सांभाळ केला. चांगल्या मुहूर्तावर ही मुलगी घरी आल्यामुळे तिला लाडाने मुहूर्ताब असे म्हणत मात्र उपवर झाल्यावर तिचे लग्न जमवण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्या मुलीने साक्षात्कार दिला व मी साधी मुलगी नसून तुळजापूरच्या देवीचा अवतार आहे. आणि सर्वांना दर्शन देऊन ती अंतर्धान पावली. एवढेच नव्हे तर तुळजापूरला येण्याचे निमंत्रण तिने गेनूची तेली यांना दिले. तेव्हापासून दसऱ्याच्या दिवशी या माय मुहूर्ताब देवीला मंदिरामध्ये निघणाऱ्या मिरवणुकीमध्ये अग्रस्थान देण्यात आले आहे. अशी आख्यायीका सांगण्यात येते. पाचव्या माळ या दिवशी या काठ्या तुळजापूरकडे जाण्याची ४०० वर्षांची परंपरा आहे. पायी तुळजापूरकडे निघाल्यानंतर नवमीला तुळजापूरमध्ये देवीला घेऊन पोहोचतात. यानंतर जिल्हाधिकारी स्वागतासाठी येतात आणि ती देवीला वाजत गाजत मंदिरामध्ये घेऊन जातात. यानंतर दशमीला म्हणजे दसऱ्याच्या दिवशी देवी मंदिराच्या बाहेर मिरवणुकीसाठी व प्रदक्षिणेसाठी जेव्हा येते तेव्हा कर्जत येथील या देवीला मिरवणुकीमध्ये अग्रस्थान देण्यात येते.

Where skeleton flowers grow best
‘ही’ दुर्मिळ फुले पावसाच्या पाण्यात दिसतात आरशाप्रमाणे पारदर्शी; असे का? जाणून घ्या…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Mahakumbh First Amrit Snan on makar Sankranti
महाकुंभातील पहिल्या अमृतस्नानाचं महत्त्व काय? मकर संक्रांतीच्या दिवशीच याचे आयोजन का केले जाते?
second phase, teacher recruitment,
शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा कधी? ऑनलाइन कामकाजासाठी प्रशासकीय मान्यता
Makar Sankranti 2025
Makar Sankranti 2025 : १९ वर्षानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी निर्माण होतोय पुष्य नक्षत्राचा संयोग, ‘या’ तीन राशींच्या घरी नांदणार लक्ष्मी
Mahakumbh 2025 Grah Yog, subh yog horoscope
Mahakumbh 2025 : महाकुंभमेळ्याच्या मुहूर्तावर ११४ वर्षांनी जुळून आला अद्भुत योग; ‘या’ तीन राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल, हाती लागणार पैशांचे घबाड
philosophers exploring the good life
तत्त्व-विवेक : सरधोपट जगण्याच्या अल्याडपल्याड…
Correlation between geological events and their time
कुतूहल : भूवैज्ञानिक कालमापन

हेही वाचा – रामराजे नाईक निंबाळकर शरद पवार गटात जाणार? इंदापूरच्या कार्यक्रमात व्यासपीठावरूनच केलं सूचक विधान!

हेही वाचा – Prithviraj Chavan : “महायुतीला तीन अंकी संख्याही गाठता येणार नाही, आम्ही १८३ जागा…”, पृथ्वीराज चव्हाण यांचं भाकीत

अशा या मायमुर्ताब देवींच्या काठ्यांचे आज पाचव्या माळेला तुळजापूरकडे प्रस्थान झाले. यावेळी बबन क्षीरसागर व इतर मानकरी आणि मोठ्या संख्येने आराधी उपस्थित होते. देवीची आरती करून त्यानंतर वाजत गाजत देवीचा गजर करत आराध्यांची नाच, गाणे म्हणत देवीला तुळजापूरकडे नेण्यात येते. यावेळी दर्शनासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांची गर्दी होते. आजही परंपरा कायम आहे.

Story img Loader