सातारा : जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पठारावरील फुले पाहण्यासाठी रविवारी पर्यटकांनी मोठी गर्दी केली. यामुळे पठाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली, तर प्रत्यक्ष पठारावर जत्रा भरल्याचे चित्र दिसत होते. या गर्दीने कासची व्यवस्था पाहणारी यंत्रणाही कोलमडून गेली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जागतिक वारसा स्थळ म्हणून गौरविल्या गेलेल्या कास पठारावर गेल्या काही दिवसांपासून रानफुले दिसू लागली आहेत. पाऊस उघडल्यानंतर ही फुले दिसू लागल्याने पर्यटक पठारावर येऊ लागले आहेत. काल, रविवारी सुटीमुळे या पर्यटकांच्या गर्दीत मोठी वाढ झाली. यामुळे पठाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली तर प्रत्यक्ष पठारावर जत्रा भरल्याचे चित्र दिसत होते. या गर्दीने कासची व्यवस्था पाहणारी यंत्रणाही कोलमडून गेली. आलेल्या पर्यटकांना पठारावर प्रवेश नाकारण्यात आला.

हे ही वाचा… Akshay Shinde Encounter : “अक्षयचा मृतदेह आम्ही ताब्यात घेणार नाही, कारण…”; आई वडिलांनी नेमकं काय म्हटलं आहे?

पठारावर फुले येतात त्यावेळी आगाऊ नोंद करत पाच हजार तर थेट पाच हजार असे दहा हजारांच्या घरात पर्यटक भेट देतात. रविवारी सोमवारी ही संख्या याहून खूप वाढल्याने फुले दिसण्याऐवजी जत्रा पाहण्यास मिळाली. या गर्दीमुळे या भागातील पर्यटकांचे व्यवस्थापन करणाऱ्या कास वन पर्यटन समितीचे कामकाजही कोलमडून गेले. अखेर त्यांनी नंतर आलेल्या पर्यटकांना पठारावर प्रवेश नाकारत अन्यत्र फिरण्यास सुचवले. दरम्यान या गर्दीमुळे पठाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. यातून वाहने बाहेर काढणे जिकिरीचे झाले होते.

हे ही वाचा… वरळी ठरले नाही; पक्ष सांगेल तिथे लढणार; अमित ठाकरे

आगाऊ आरक्षण करूनही गर्दीमुळे आमचा खूप मोठा वेळ हा वाहतूक कोंडीत अडकण्यात गेला. कास पठारावर पोहोचण्यास उशीर झाल्याने संध्याकाळी कशीबशी फुले पाहता आली. मुळात पर्यटकांसाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. – शर्वरी कुलकर्णी, पर्यटक