Petrol and diesel prices today, 4th June : लोकसभा निवडणूक २०२४ चा निकाल आज जाहीर होणार आहे. देशात ७ टप्प्यात तर महाराष्ट्रात ४८ मतदारसंघात ५ टप्प्यात मतदान झाले आहे. तर महाराष्ट्रातील ४८ जागांवर कोण बाजी मारणार हे आज जाहीर होईल. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष आज या निकालाकडे लागून राहिले आहे. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. तर लोकसभा निवडणूक २०२४ चा निकाल दरम्यान नागरिकांना दिलासा मिळणार का ? पेट्रोल-डिझेलचे दर घसरणार का? हे या लेखातून सविस्तर जाणून घेऊया.

लोकसभा निवडणुकीच्या निकालपूर्वी महाराष्ट्रातील काही शहरांत पेट्रोल-डिझेलचा दर कमी झालेला पाहायला मिळाला आहे. तर तुमच्या शहरात इंधनाचा भाव काय आहे ते खाली दिलेल्या तक्त्यातून पाहा…

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०४.४१९०.९३
अकोला१०४.१६९०.७२
अमरावती१०४.८२९१.३५
औरंगाबाद१०४.९९९१.४८
भंडारा१०५.०२९१.५५
बीड१०४.९९९१.०२
बुलढाणा१०४.७४९१.२८
चंद्रपूर१०४.०४९०.६२
धुळे१०४.५६९१.०९
गडचिरोली१०५.१८९१.७१
गोंदिया१०५.५६९२.०६
हिंगोली१०५.४४९१.९५
जळगाव१०४.३५९०.८८
जालना१०४.३५९२.२२
कोल्हापूर१०४.२७९०.८२
लातूर१०५.७०९२.१८
मुंबई शहर१०४.२१९२.१५
नागपूर१०३.९६९०.५२
नांदेड१०६.४५९२.९२
नंदुरबार१०५.१४९१.६४
नाशिक१०४.६९९१.२०
उस्मानाबाद१०४.७७९१.३०
पालघर१०४.०१९०.५१
परभणी१०७.३९९३.७९
पुणे१०४.०२९०.५५
रायगड१०४.०३९०.५४
रत्नागिरी१०५.६१९२.०८
सांगली१०४.०९९०.६५
सातारा१०४.२४९०.७६
सिंधुदुर्ग१०५.९०९२.३९
सोलापूर१०४.३०९०.८२
ठाणे१०४.४१९२.३४
वर्धा१०४.३३९०.८८
वाशिम१०४.८७९१.४०
यवतमाळ१०५.४४९१.९५

दररोज सकाळी ६ वाजता सरकारी तेल कंपन्या कच्या तेलाच्या किंमती जाहीर करतात. त्यानुसार प्रत्येक शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती निश्चित केल्या आहेत. आता जून महिना सुरु झाला आहे. तर आजचे दर सुद्धा सकाळीच जाहीर झाले आहेत.पण, आज लोकसभा निवडणुकीच्या निकाल आहे. त्यामुळे नागरिकांचे लक्ष पेट्रोल-डिझेलच्या किमतीकडे लागून आहे.

महाराष्ट्रातील काही शहरांत पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये सुधारणा झाली आहे. बीड, जळगाव, जालना, उस्मानाबाद, सांगली, सातारा या शहरांत पेट्रोलच्या किंमती कमी झाल्याचे पाहायला मिळालं आहे. तर अकोला, बीड, हिंगोली, सातारा या शहरांत डिझेलच्या किंमती कमी झाल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच काही शहरांत किंचित दरवाढ तर काही ठिकाणी मात्र पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल नोंदवला गेला नाही आहे. त्यामुळे नागरिकांना येत्या काही दिवसांत दिलासा मिळणार की त्यांचे ताण वाढणार हे पाहण्यासारखं असेल.

लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोगाची सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणूक आयोग सर्वात आधी पोस्टल मतांची मोजणी सुरु झाली असेल . त्यानंतर मग EVM मशीन उघडले जातील. प्रत्येक मतदारसंघात किती मतदान झालं आहे. त्यानुसार मतमोजणीच्या फेऱ्या होतील. एकंदरीतच संपूर्ण देशाचे लक्ष या निकालाकडे लागून राहील आहे.महाराष्ट्रातील ४८ जागांवर कोण बाजी मारणार याची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे.