धाराशिव : बीडनंतर धाराशिव जिल्ह्यात सलग तीन दिवस झालेल्या हिंसक आंदोलनामुळे जिल्हाधिकार्‍यांनी लागू केलेली संचारबंदी बुधवारी सायंकाळी ५ वाजता मागे घेण्यात आली. जमावबंदीचे आदेश कायम आहेत. दरम्यान  दुसर्‍या दिवशीही शहरात कडकडीत बंद होता. आंदोलनाच्या आठव्या दिवशी विविध संघटनांनी साखळी उपोषणात सहभाग नोंदविला असून आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे मागे घेण्यात यावे, अशी मागणी जिल्हा विधीज्ञ मंडळाने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. संचारबंदी उठवल्यानंतर व्यापारी व सामान्यांचे दैनंदिन व्यवहार पुन्हा नियमित सुरू झाले आहेत. बुधवारी कुठेही हिंसक आंदोलन झाले नाही. परंतु गावोगावी शांततेत साखळी उपोषण सुरू होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा