धाराशिव: भारत माता की, जय, वंदे मातरम् अशा गगनभेदी घोषणांनी बुधवारची सकाळ दणाणून गेली. निमित्त होते ऑपरेशन पोलोच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने ऑपरेशन पोलोच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. शाळकरी विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिक, प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी आणि १७० सायकलपटूंनी धाराशिव ते तुळजापूर असा प्रवास करीत देशभक्तीपर घोषणा देत ७५ वर्षांपूर्वी मराठवाड्याच्या मुक्तीसाठी शहिद झालेल्या कॅव्हेलियन-३ रेजिमेंटच्या जवानांना मानवंदना दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यात शहिद झालेल्या लष्करातील कॅव्हेलियन-३ रेजिमेंटच्या जवानांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मोठ्या संख्येने धाराशिव आणि तुळजापूरमधील नागरिक जमा झाले होते. तुळजापूर येथे स्मृतिस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली. १३ सप्टेंबर १९४८रोजी ऑपरेशन पोलो दरम्यान निजामाच्या सैन्याशी लढताना तुळजापूर येथे झालेल्या युध्दात जमादार हरिराजसिंह आणि जमादार मांगेराम कामी आले होते. त्यांनी दिलेल्या हौतात्म्याबद्दल त्यांच्या स्मृतिस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून सैनिकी मानवंदना देण्यात आली.

हेही वाचा >>>“एकनाथ खडसे रावेरमधून लोकसभा निवडणूक लढले तर…”, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य चर्चेत

मुक्तीसंग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून धाराशिव ते तुळजापूर सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ७ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातून सायकलरॅलीस प्रारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्यासमवेत जिल्हा प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांनीही या सायकलरॅलीत सहभाग नोंदविला होता. शहराच्या मुख्य रस्त्यावर वेगवेगळ्या शाळेतील विद्यार्थ्यांनी या रॅलीत सहभागी झालेल्या सायकलपटूंवर देशभक्तीपर जयघोष करीत पुष्पवर्षाव केला. त्याचबरोबर पारंपारिक नृत्य, लेझीम आदी कलांचे सादरीकरण करीत ऑपरेशन पोलोच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी विद्यार्थीही मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

हेही वाचा >>>सांगली : भरपाईसाठी महाराष्ट्र एक्सप्रेस रोखली

१७० सायकलपटूंचा सहभाग

ऑपरेशन पोलोच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सायकल रॅलीमध्ये १५० सायकलपटूंनी पूर्वनोंदणी केली होती. त्याचबरोबर ऐनवेळी स्वयंस्फूर्तीने अधिकच्या २० नागरिकांनीही यात सहभाग घेतला. एकूण १७० सायकलस्वारांनी धाराशिव ते तुळजापूर सायक्लोथॉनमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होवून मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे केले.

भारतीय सैन्यदलाच्या अधिकार्‍यांची उपस्थिती

कॅव्हेलियन-३ बटालियनच्या शहिद जवानांना मानवंदना देण्यासाठी भारतीय लष्कराच्या जवानांनीही यावेळी हजेरी लावली. भारतीय सेनेतील कॅव्हेलियन-३ युनिटचे जवान सुभेदार संतप्रताप, हवालदार गजेंद्रसिंह, नायक दलवीरसिंंघ, लान्स नायक अशिषकुमार, लान्स नायक विकास चव्हाण यांच्यासह ७५ वर्षांपूर्वी मराठवाड्याच्या स्वातंत्र्यासाठी होतात्म्य पत्करलेल्या जमादार मांगेराम आणि जमादार हरिराजसिंह यांचे नातेवाईकही यावेळी उपस्थित होते.