अलिबाग : किल्ले रायगडावर १ जून ते ७ जून या कालावधीत ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जाणार आहे. या कालावधीत गडावर लाखो शिवभक्त आणि पर्यटक दाखल होण्याची शक्यता आहे हीबाब लक्षात घेऊन रायगड किल्ला परिसरात तब्बल २ हजार पोलीसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सात दिवस चोविस तास हा बंदोबस्त तैनात असणार आहे. त्यामुळे किल्ले रायगडाला सध्या छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यसरकारच्या वतीने यंदाच्या शिवराज्याभिषेक सोहळा भव्यदिव्य स्वरुपात साजरा केला जाणार आहे. १ जून ते ७ जून या कालावधीत गडावर विविध सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राजसदरेवर भव्य राजवाड्याच्या धर्तीवर मंडप उभारण्यात आला आहे. या दिवसात लाखो शिवभक्त गडावर दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गडावरील बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, राज्यमंत्री मंडळातील अनेक मंत्री आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे या सोहळ्याला २ जूनला हजेरी लावणार आहेत. या त्यामुळे या संपुर्ण परिसराला छावणीचे स्वरुप प्रात् झाले आहे. २ हजार पोलीस येथे २४ तास रात्रंदिवस तैनात असणार आहेत.

हेही वाचा… Maharashtra News Live: जितेंद्र आव्हाडांनी खरंच सिंधी समाजाचा अवमान केला? स्वत: ट्वीट केले भाषणाचा मूळ व मॉर्फ्ड व्हिडीओ, म्हणाले…!

रायगडावर १०९ सिसिटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. गडावर आणि गडाखाली ३ ठिकाणी या सिसिटीव्ही कॅमेऱ्यामधील हालचालींवर नजर ठेवली जाणार आहे. गडावर १० ठिकाणी कायम स्वरुपी सिसिटीव्ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. तर गडाच्या पायथ्याशी १० ठिकाणी तात्पुरती सिसिटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.

हेही वाचा… मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी, शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने गृह विभागाचे आदेश

रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी महाड मार्गे येणाऱ्या वाहनांसाठी कोंझर येथे ३ हजार ७०० वाहनांसाठी वाहनतळ उभारण्यात आले आहे. तर निजामपूर मार्गे येणाऱ्या वाहनांसाठी शिवसृष्टीमैदान येथे २ हजार ४०० वाहनांसाठी वाहनतळ तयार करण्यात आले आहे.या वाहनतळांपासून पाचाड नाका पर्यंत एसटीची मोफत शटल सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. गडावर येणाऱ्या शिवभक्तांना सुचना देण्यासाठी ३५ ठिकाणी पब्लिक अनाऊन्समेंट सिस्टीम बसविण्यात आली आहे. ज्या माध्यमातून शिवभक्तांना पोलीस प्रशासाना मार्फत सुचना दिल्या जाणार आहेत. आपत्ती व्यवस्थापन आणि गर्दी नियोजनासाठी पोलीसांनी ४३ बिनतारी संदेश यंत्र आणि १५० वॉकीटॉकी युनिट्स कार्यान्वित केली आहेत.

हेही वाचा… दक्षिण अमेरिकेत ‘जय शिवाजी’चा जयघोष घुमणार! कार्यक्रम काय?

आपत्कालीन परिस्थितीत शिवभक्तांना तात्काळ मदत मिळावी यासाठी पाचाड नाका आणि गडावर होळीचा माळ असे दोन नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. मदतीची गरज असल्यास शिवभक्तांनी ८०१०११४४११ आणि ८०१०२२३३०० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांनी केले आहे.

गडावरील पोलीस बंदोबस्त २०० पोलीस अधिकारी आणि २ हजार पोलीस कर्मचारी तैनात असणार आहेत. यात ४ अप्पर पोलीस अधिक्षक, १६ पोलीस उप अधिक्षक, ३७ पोलीस निरीक्षक, १२६ सहाय्यक पोलीस निरीक्षक, १११३ पोलीस कर्मचारी, १९२ वाहतुक पोलीस, ३५० होमगार्ड, १ एसआरपीएफ तुकडी, ३ आरसीपी युनिट्सचा समावेश आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: On the occasion of coronation day of chhatrapati shivaji maharaj heavy police deployment on raigad fort asj