अजमेर दर्गा शरीफ येथील ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांचा ८१३ वा उरूस लवकरच सुरू होणार आहे. यानिमित्ताने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी चादर पाठवली आहे. खादिम सय्यद जिशान चिश्ती यांच्याकडे ही चादर सुपूर्द करण्यात आली. यावेळी शिवसेना नेते विनायक राऊत, शिवसेना उपनेते नितीन नांदगावकर, मुजफ्फर पावसकर, कमलेश नवले, नौमान पावसकर तसेच उपशाखाप्रमुख गणेश माने आदी उपस्थित होते.

जगप्रसिद्ध सुफी संत ख्वाजा मोईनुद्दीन हसन चिश्ती यांच्या ८१३ व्या उरुससाठी अंजुमन कमिटीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. अंजुमन समितीचे सचिव सय्यद सरवर चिश्ती यांनी उरुसचे विधी आणि दर्ग्याच्या व्यवस्थेबाबत चर्चा केली.

Story img Loader