हलगीचा कडकडाट… घुंगराचा चाळ… शिंगाणा रंग देत त्यावर मोराचा पिसारा लावून नटवलेल्या म्हशीं आणि म्हैस मालकांचा उत्साह अशा वातावरणात दिवाळी पाडव्या दिवशी कोल्हापुरातील कसबा बावडा येथे म्हशी पळवण्याची स्पर्धा पार पडली. दिवाळीतल्या पाडव्याला दरवर्षी ही स्पर्धा आयोजित केली जाते. त्याचप्रमाणे यावर्षी ही स्पर्धा आयोजित केली गेली होती. अनेक वर्षांपासूनची ही परंपरा गेली अनेक वर्षे कोल्हापूरने जपली आहे. दरवर्षी प्रमाणे यंदा ही हा कार्यक्रम एकदम जोशात पार पडला. कसबा बावडा येथील मार्केट परिसरात सकाळ पासूनच नागरिकांनी आपल्या म्हशी घेऊन गर्दी केली होती.

पाडव्याच्या निमित्ताने म्हशी पळवण्याची स्पर्धा

दिवाळी पाडव्यानिमित्त म्हशी सजविण्याचा पारंपरिक बाज कोल्हापुरात आजही जपला जातो. सकाळी पंचगंगा नदीवर म्हशी आंघोळ घातली जाते. त्यानंतर सजवलेल्या म्हशी कसबा बावडा येथे आणल्या जातात. म्हशींच्या अंगावर सुंदर नक्षीकाम आणि विविध सामाजिक संदेश लिहिलेले असतात. गळ्यात व पायात घुंगरांची माळ, शिंगांवर मोरपीसे, रिबीन याद्वारे म्हशींना सजविण्यात आले. मोटरसायकल सायलेंसर काढून मोठा आवाज करत गाडीच्या मागे म्हैस पळवणे, झेंडा दाखवत अशा विविध स्पर्धा भरवल्या जातात.कोल्हापुरातील कसबा बावडा, शनिवार पेठेतील गवळी गल्ली, पंचगंगा नदी घाट, सागरमाळ, पाचगाव या ठिकाणी पाडवा तसेच भाऊबीजेच्या दिवशी हे म्हशी पळवण्याचा कार्यक्रम आयोजित केले जातात. हे पाहण्यासाठी शहरवासीयांची ही मोठी गर्दी झाली होती.

Aditi Tatkare, Ladki Bahin Yojana, Ladki Bahin Yojana Fund, Fund Issue, Aditi Tatkare Pune,
लाडक्या बहीण योजनेसाठी इतर कोणत्याही विभागाचा निधी वळविण्यात आलेला नाही – मंत्री आदिती तटकरे
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Loksatta Chatura How to plan a New Year 2024 party at home
चतुरा: घरीच करा न्यू ईयर पार्टीची धम्माल
Prices will increase due to reduced arrival of chillies Nandurbar news
यंदा लाल तिखटाचा भडका उडणार; मिरचीची आवक घटल्याने दर वाढणार
Mooli ka raita recipe how to make muli ka raita mulyachi koshimbir recipe in marathi
हिवाळ्यात हा चटकदार पदार्थ खायलाच हवा, जेवण होईल चवदार; मुळ्याचे रायते कसे करायचे जाणून घ्या
got elected four times through evms supriya sule on evm tampering allegations by congress
चार वेळा निवडून आले ईव्हीएमवर संशय कसा घेऊ? खासदार सुप्रिया सुळे यांचे विधान
Income Tax , salary , Finance Minister,
पगारदारांच्या ‘इन्कम टॅक्स’मध्ये कपात? क्रयशक्तीत वाढीसाठी अर्थमंत्र्यांकडून उपाय शक्य
Shegaon Gajanan Maharaj temple , Shegaon,
अवघी दुमदुमली संतनगरी! विदर्भ पंढरीत पाऊण लाख भाविकांची मंदियाळी…

सुंदर मी होणार या असं या स्पर्धेचं नाव होतं. शेतकरी बांधव गावात जास्त आहेत. गायी-गुरं ही कायमच शेतकऱ्याला मदत करणारी असतात. त्यांच्याप्रति कृतज्ञता म्हणून ही स्पर्धा भरवली जाते. आम्ही हा उपक्रम दरवर्षी भरवत असतो. अशी माहिती भारतवीर तरुण मित्रमंडळाचे कार्यकर्ते मानसिंग जाधव यांनी दिली.

Story img Loader