राज्यातील आमदारांच्या घरांवर दगडफेक, जाळपोळीच्या घटना चालू असताना त्यांच्या गाड्यांचीही तोडफोड केली जात आहेत. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीचीही आज तोडफोड करण्यात आली. मुंबईतील कुलाबा येथील आमदार निवासाजवळ हसन मुश्रीफ यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. याप्रकरणी त्यांनी आज प्रतिक्रिया दिली आहे.

आज माध्यमांना प्रतिक्रिया देताना हसन मुश्रीफ म्हणाले की, मराठा आरक्षणप्रश्नी सरकार गंभीर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीही यासंदर्भात बैठक झाली. आज सर्वपक्षीय बैठक आहे. लवकरात लवकर यावर तोडगा काढावा लागेल. कोर्टात काय होईल, काय होणार नाही हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

What Sharad Pawar Said?
Sharad Pawar : शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत,”महायुतीने ज्या योजना आणल्या त्याचा त्यांना फायदा होईल, पण…”
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Tuljapur Devanand Rochkari, Tuljapur, Dheeraj Patil,
तुळजापुरात मैत्रीपूर्ण लढत की, आघाडीत बिघाडी? मविआचा अधिकृत उमेदवार कोण? रोचकरी की, पाटील?
Sanjay singh
Sanjay Singh: आपचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय सिंह म्हणतात, “हम ना बटेंगे ना कटेंगे; हम भाजप को लपेटेंगे”
Vishwajeet Kadam jayshri patil
Vishwajeet Kadam: जयश्री पाटील यांना बंडखोरीस भाग पाडले – विश्वजित कदम
Dhule City Polarization of votes beneficial to any candidate print politics news
लक्षवेधी लढत: धुळे शहर : मतांचे ध्रुवीकरण कोणाला फायदेशीर?
Sunil Tatkare on Jayant Patil
“जयंत पाटील आतल्या गाठीचे, त्यांनी…”, अजित पवार गटाकडून टीका; म्हणाले, ‘यावेळी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार’
Ramesh Chennithala
Ramesh Chennithala : “हरियाणाच्या निवडणुकीतून खूप शिकायला मिळालं, त्यामुळे ८० टक्के बंडखोरांनी…”, रमेश चेन्निथला यांचं महाराष्ट्राच्या निवडणुकीबाबत मोठं भाष्य

हेही वाचा >> ठाणे: मुख्यमंत्र्यांसह राजकीय नेत्यांच्या घराबाहेर सुरक्षेत वाढ; मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस सतर्क

ते पुढे म्हणाले की, आज माझ्या गाडीवर दगडफेक झाली. दगडफेक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करू नये असं मी गृहमंत्र्यांना सांगणार आहे. आमदारांची कुटुंबीय घरात असताना त्यांची घरं जाळणं हे दुर्दैवी आहे. अशा घटना अजिबात होऊ नयेत. त्यामुळे आंदोलनाला गालबोट लागता कामा नये. त्यामुळे सहानुभूती जाते, याचा विचार नेतेमंडळी आणि तरुणांनी केला पाहिजे.

“मराठा आंदोलनात नेतृत्त्व दिसत नाही. आंदोलनाची दिशा कशी असावी हे समजून सागावं लागेल. अशा घटनांमध्ये स्थानिक विरोधक भाग घेऊन आंदोलन करत आहेत का अशी शंका आहे. सत्ताधारी स्वतःच्या आमदारांची घरे आणि गाड्या जाळतील का? स्थानिक पातळीवरचं राजकारण असल्याशिवाय अशा गोष्टी होत नाहीत”, असंही ते म्हणाले.

राज्यात कडेकोट बंदोबस्त

राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलने तीव्र झाली असून काही ठिकाणी रास्ता रोको आणि जाळपोळीचे प्रकार सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर सर्तक झालेल्या ठाणे पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ठाण्यातील निवासस्थान परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढविली आहे. शिवाय, शहरातील राजकीय तसेच महत्त्वाच्या व्यक्तींच्या निवसास्थान परिसरातील सुरक्षेत पोलिसांनी वाढ केली आहे. तसेच पोलिसांच्या सुट्ट्याही रद्द करण्यात आल्या आहेत.