राज्यात करोना रुग्णसंख्या वाढत असल्याने ठाकरे सरकार कठोर पावलं उचलण्याच्या तयारी असल्याचे दिसत आहे. तर, विदर्भात करोनाची संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत असुन अकोला, अमरावती आणि यवतमाळमध्ये करोनाबाधितांची वाढती संख्या चिंतेचा विषय ठरत आहे. या पार्श्वभूमीमवर आज(गुरुवार) अमरावतीमध्ये एक दिवसासाठी लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी हा लॉकडाउन जाहीर केला आहे.

शनिवार २० फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजेपासून रविवारचा(२१ फेब्रुवारी) संपूर्ण दिवस व सोमावर (२१ फेब्रुवारी) रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत अमरावती जिल्ह्यात कडक लॉकडाउन राहणार आहे. या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व बाबी बंद असणार आहेत. संपूर्ण अमरावती जिल्हा एका दिवसासाठी ठप्प करण्यात आलेला आहे.

ठाकरे सरकारकडून ‘या’ तीन जिल्ह्यांमध्ये लॉकडाउनची तयारी?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“अमरावतीत रुग्णसंख्या वाढली आहे. जवळपास संपूर्ण कुटुंबाला करोना ग्रासलं आहे. त्याच्यानंतर मी मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्व माहिती घेऊन सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव आणि संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीसाठी बोलावलं आहे. या बैठकीत या तीन शहरांसाठी काय निर्णय घ्यायचा? त्यात ग्रामीण भागही घ्यायचा का? यासंबंधी चर्चा होणार आहे,” अशी माहिती या अगोदर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती.