Ghatkopar Accident : कुर्ला येथे झालेला बेस्ट बसचा अपघात ताजा असतानाच घाटकोपर येथे एका टेम्पोने चाप जणांना धडक दिली आहे. शुक्रवारी सायंकाळी हा प्रकार घडला. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून तीन महिला आणि एका जखमी पुरुषाला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, ही घटना सायंकाळी साडेसहाच्या सुमारास चिराग नगर भागातील मासळी मार्केटमध्ये घडली. टेम्पो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. उत्तम खरात (२५) असे चालकाचे नाव असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. तो दारूच्या नशेत होता का, याचा तपास पोलीस करत आहेत.

Rajeshwar Chavan
Rajeshwar Chavan : संतोष देशमुख हत्याप्रकरणी बीडच्या जिल्हाध्यक्षांची सीआयडी चौकशी; म्हणाले, “राजकारणात…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
What Poonam Mahajan Said About Pramod Mahajan ?
Poonam Mahajan : ‘प्रमोद महाजन यांना ठार करण्याचं षडयंत्र कशासाठी आखलं गेलं?’ पूनम महाजन यांचं उत्तर, “त्यांना…”
Suresh Dhas on Dhananjay Munde
Suresh Dhas: “प्राजक्ताताई माळीही परळीत येतात…”, परळी पॅटर्नचा उल्लेख करत सुरेश धस यांची धनंजय मुंडेंवर टीका
Kanpur Crime News
Kanpur : धक्कादायक! महिलेची हत्या करून मृतदेह ‘व्हिआयपी’ परिसरात पुरला; चार महिन्यांनी ‘असं’ उलगडलं घटनेचं रहस्य
nawab malik son in law sameer khan passed away
नवाब मलिक यांच्या जावयाचे निधन; काही दिवसांपूर्वी झाला होता गंभीर अपघात, निवडणूक काळात कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

प्रीती पटेल (३५) असे मृत महिलेचे नाव असून ती घाटकोपरमधील पारशीवाडी येथील रहिवासी आहे. इतर चार जखमींमध्ये रेश्मा शेख (२३), मारुफा शेख (२७), तोफा शेख (२८) आणि मेहराम अली शेख (२८) यांचा समावेश आहे.

हेही वाचा >> कुर्ला बस अपघातातील आणखी एका जखमीचा मृत्यू, मृतांची संख्या आठवर

कसा घडला अपघात?

काही दिवसांपूर्वी कुर्ल्यात बेस्ट बसचा अपघात झाला होता. या अपघातात जवळपास आठ लोकांचा मृत्यू झाला. चालकाने मद्यपान केल्याचं प्राथमिक अहवालातून समोर आलं असून याप्रकरणी चौकशी सुरू आहे. दरम्यान, हे प्रकरण ताजं असतानाच घाटकोपर येथे अपघात घडलाय. हा टेम्पो नारायण नगरहून घाटकोपरच्या दिशेने भरधाव वेगाने येत होता. हा टेम्प बाजारात शिरला आणि तेथे असलेल्या स्टॉल्सचा उडवत निघाला. यामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर पाच ते सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतलं आहे.

कुर्ला अपघात कसा घडला होता?

कुर्ला पश्चिम येथील महापालिकेच्या एल विभाग कार्यालयासमोर गेल्या सोमवारी रात्री १० च्या सुमारास भीषण अपघात झाला होता. भरधाव वेगात धावणाऱ्या बेस्टच्या बसने अनेक पादचारी व वाहनांना धडक दिली. या अपघातामध्ये ४९ जण जखमी झाले, तर सात जणांचा मृत्यू झाला होता. जखमींपैकी शीव रुग्णालयात दाखल असलेल्या आणखी एकाचा सोमवार, १६ डिसेंबर रोजी मृत्यू झाला. बेस्ट बसच्या भीषण अपघातातील मृतांची संख्या आठ झाली आहे.

Story img Loader