ट्रकने ठोकर मारल्यामुळे झालेल्या अपघातात मोटार-सायकलस्वार जागीच ठार झाला. ही दुर्घटना रसायनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत २० नोव्हें.ला दुपारच्या सुमारास सावळागावच्या हद्दीत घडली. मोहन मोहेकर (रा. कळंबोली) असे मृत मोटार-सायकलस्वाराचे नाव आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. एमएच-२१-एक्स-३५१६ क्र. ट्रक कसळखंड, ता. पनवेल येथून आपटामार्गे अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथे जात होता. दरम्यान, मोहन मोहेकर एम.एच.-४६ आर १४९२ क्र.च्या मोटार-सायकलवरून रसायनी येथून कोनफाटय़ाकडे जात होता. सावळागावच्या वळणावर ट्रकने मोटार-सायकलला समोरून ठोकर मारली. मोटार-सायकलस्वार मोहेकर जागीच ठार झाला. अपघाताची खबर ट्रकचालक ज्ञानेश्वर उतेकर (२२, जालना) याने रसायनी पोलीस स्टेशनमध्ये स्वत: दिली. सदर प्रकरणी स. पो. नि. गुप्त यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक वैभव पाटील अधिक तपास करीत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One dead in truck collide on bike