लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका ६५ वर्षीय करोनाबाधित व्यक्तीचा मंगळवार, २६ मे रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. या व्यक्तीला मधुमेह हा अतिजोखमीचा आजार होता. मुंबई येथून आलेल्या करोनाबाधित महिलेसोबत प्रवास केलेल्या पाच व्यक्तींचे अहवाल सकारात्मक आले होते. त्यांच्यावर वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु असून यापैकी ६५ वर्षीय व्यक्तीला गेल्या चार दिवसांपासून कृत्रीम ऑक्सिजन देऊन डॉक्टरांचे पथक उपचार करीत होते. मात्र, मंगळवारी त्यांची प्रकृती बिघडली,  रात्री ११ वाजताच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिली आहे.

Story img Loader