लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका ६५ वर्षीय करोनाबाधित व्यक्तीचा मंगळवार, २६ मे रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. या व्यक्तीला मधुमेह हा अतिजोखमीचा आजार होता. मुंबई येथून आलेल्या करोनाबाधित महिलेसोबत प्रवास केलेल्या पाच व्यक्तींचे अहवाल सकारात्मक आले होते. त्यांच्यावर वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु असून यापैकी ६५ वर्षीय व्यक्तीला गेल्या चार दिवसांपासून कृत्रीम ऑक्सिजन देऊन डॉक्टरांचे पथक उपचार करीत होते. मात्र, मंगळवारी त्यांची प्रकृती बिघडली, रात्री ११ वाजताच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा