सातारा: वाई महाबळेश्वर रस्त्यावर वाई बसस्थानकाच्या समोर भरधाव मोटारीने ठोकर मारल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. साडेतीन वर्षांच्या मुलासह अन्य चार जण गंभीर जखमी झाले. वाहनचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भर गर्दीच्या रस्त्यात भरधाव वाहन घुसल्याने हा अपघात झाला, असे परिक्षाविधीन पोलीस उपविभागीय अधिकारी श्याम पानेगावकर यांनी सांगितले. वाई बसस्थानकाच्या समोर महाबळेश्वर येथून वाई शहराकडे येणाऱ्या रस्त्यावर भरधाव वाहनाने गाडी क्रमांक (एमएच ०४ जीई ६६९५) रस्त्याच्या कडेने चालणाऱ्यांना जोरदार धडक मारली.

गाडी त्याच वेगात पुढे जात राहिल्याने गाडीच्या धक्क्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात राजेंद्र बजरंग मोहिते ( सोळशी, ता. कोरेगाव) यांचा जागीच मृत्यू झाला. अक्षय नामदेव कदम व अविनाश केळगणे (वारोशी, ता. महाबळेश्वर) सीताराम धायगुडे (वाई) व शिवांश जालिंदर शिंगटे (राऊतवाडी ता. कोरेगाव) हा साडेतीन वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाले. जखमींना वाई व सातारा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

traffic stopped due to snake crossing road on khambatki ghat
सातारा : सरपटणाऱ्या जीवासाठी खंबाटकी घाट थांबला
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Bandra East Former Congress MLA Zeeshan Siddique (left). (Photo Credit: Instagram/Zeeshan Siddique )
Zeeshan Siddique : “मविआने मला शब्द दिला होता आणि उद्धव ठाकरेंनी..”; झिशान सिद्दिकी काय म्हणाले?
Raj Thackeray Slams Uddhav Thackeray in his Speech
Raj Thackeray : राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका, “बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते माझ्या शिवसेनेची काँग्रेस होताना दिसली तर..”
viral video of vardha
VIDEO : आधी कानाखाली मारली अन् खाली पाडून…; राज्यात दिवसाढवळ्या तरुणीला मारहाण, कारण काय?
Hemant Godse On Chhagan Bhujbal :
Hemant Godse : महायुतीत धुसफूस? शिंदे गटाच्या नेत्याचा छगन भुजबळांवर गंभीर आरोप; म्हणाले, ‘पाठीत खंजीर खुपसला’
Manoj Jarange News
Manoj Jarange : “मराठे निवडणूक लढवणार नाहीत, कारण एका जातीवर…”; मनोज जरांगेंची मोठी घोषणा
Sharad Pawar on Jarange Patil
Sharad Pawar : मनोज जरांगेंनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “मला आनंद, कारण…”

सर्व पादचारी वाई बाजारपेठेतील आपली कामे उरकून आपापल्या घरी चाललेले असताना सायंकाळी साडेचारच्या दरम्यान हा अपघात झाला. या अपघाताने बसस्थानक परिसरात एकच गोंधळ उडाला. नागरिक व आजूबाजूच्या व्यापाऱ्यांनी भरधाव वाहन अडवून चालकाला चोप दिला. गाडीतील अन्य तीन जण पळून गेले. हसन जिन्नससाहेब बोरवी (कोरची ता. हातकणंगले, कोल्हापूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, अशी माहिती परिक्षाविधीन पोलीस उपविभागीय अधिकारी श्याम पानेगावकर यांनी दिली. उपनिरीक्षक बिपीन चव्हाण तपास करत आहेत.

Story img Loader