सांगली जिल्हयातील पेठ ते शिराळा या राज्य मार्गावर दोन मोटारींची समोरासमोर धडक झाल्याची घटना घडली आहे. या अपघाता एक जण ठार झाला असून अपघातानंतर वाहनांनी पेट घेतला. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले होते. या आगीत एक कार पूर्णतः जळून खाक झाली.
हेही वाचा- दिशा सालियनच्या वडिलांना माध्यमांशी बोलू न दिल्याचा आरोप, संजय राऊत म्हणाले, “सुपारीबाज लोक…”
इस्लामपूरकडून शिराळाकडे जाणाऱ्या कारचालकाने भरधाव वेगाने चुकीच्या दिशेने चालवल्याने सदरचा अपघात झाला. शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. या अपघातात शिराळा येथील संदीप आनंदा शेवाळे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी दिपाली, मुलगा श्रीराज, मुलगी आराध्या व समोरील कारचे चालक संदीप मारुती लोंढे हे जखमी झाले आहेत. अपघातानंतर संदीप लोंढे यांची कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे. इस्लामपूर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.