कराड व लगतच्या मलकापूर येथील तीन दुकानांवर छापे टाकून पोलिसांनी सुमारे ६० हजारांचे सुमारे एक टन वजनाचे कॅल्शियम कार्बाईड जप्त करताना,  बालेखान महंमद मुल्ला (वय ४८), मुबीन नरूद्दीन मुल्ला (२८) व गिरीश चतुरलाल शाह (तिघेही रा. मलकापूर) यांना अटक केली आहे.
बालेखान मुल्ला यांच्या मलकापुरातील शार्प इंडस्ट्रीजमधून ६१० किलो, मुबीन मुल्ला यांच्या येथील शार्प इंडस्ट्रीजमधून १२० किलो, तर गिरीश शाह यांच्या येथील किरण ट्रेडर्समधून ३६० किलोची कॅल्शियम कार्बाईड हे स्फोटक हस्तगत करण्यात आले आहे. कराड शहर पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, निरीक्षक राजमाने व फौजदार वणवे यांच्या पथकांनी तिन्ही दुकानात एकाचवेळी छापे टाकले. हे कॅल्शियम कार्बाईड फळे पिकवण्यासाठी उपयोगात आणले जात असल्याची चर्चा असून, तसे असेल तर कृ त्रिमरीत्या फळे पिकवण्याचा उद्योग किती कालावधीत सुरू आहे?  त्यातून नागरिकांची झालेली फसवणूक याबाबत अन्नभेसळ खात्याने आजवर काय कारवाई केली. तसेच, हे घातक स्फोटक नेमक्या कोणत्या कारणासाठी येथील व्यापाऱ्यांनी आपल्याकडे बाळगले असे प्रश्न उपस्थित होते आहेत.

Story img Loader