भरधाव वेगाने आलेल्या टँकरने रस्त्याकडेला उभ्या असलेल्या दोन महिलांना ठोकरल्याने एक महिला जागीच ठार झाली तर दुसरी महिला गंभीर जखमी झाली आहे. वेगवान टँकरने रस्त्याकडेला असलेल्या दोन दुचाकीचाही चुराडा केली असून हा विचित्र अपघात मंगळवारी सकाळी कराड- पंढरपूर मार्गावरील झरे (ता. आटपाडी) येथे घडला.

हेही वाचा- सांगली: सागरेश्वरमध्ये दोन हरणांचा मृत्यू

two killed and one injured in collision on dhule solapur highway
महामार्गावरील अपघातात सांगलीचे दोघे ठार; एक जखमी
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
4 crushed to death after sand-laden truck flips
Accident Video : रस्त्याच्या कडेला काम कारणाऱ्या कामगारांवर वाळूने भरलेला ट्रक उलटला! दोन वर्षांच्या चिमुरड्यासह चौघांचा मृत्यू
akola terrible accident on Apatapa road killed one and injured six on Friday night
रस्त्यावरील उभ्या ट्रॅक्टरमुळे घात; एक ठार, सहा जखमी…
accident video viral
“एक चूक अन् खेळ खल्लास!” भरधाव वेगाने आला, अचानक घसरली बाईक, रस्ता ओलांडणाऱ्या शाळकरी मुलींना…थरारक अपघाताचा Video Viral
accident to Vehicle of devotees returning from Mahakumbh on Samruddhi Highway
‘समृद्धी’वर चालकाला लागली डुलकी, कुंभतून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला!
Domino Effect Crash Sudden Scooty Brake Causes Multi-Vehicle Pileup Internet Reacts WATCH
“वो स्त्री है कुछ भी कर सकती है…” भररस्त्यात दुचाकीस्वार काकूंनी अचानक मारला ब्रेक, एकमेकांना धडकल्या मागून येणाऱ्या गाड्या, विचित्र अपघाताचा Video Viral
Traffic police officer beaten with slippers while taking action case registered against two women
कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिसाला चप्पलेने मारहाण, दोन महिलांविरुद्ध गुन्हा

याबाबत माहिती अशी की झरे येथे भरघाव वेगाने आलेल्या टँकर (एमएच ५०-८८८८) चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. टँकरने पारेकरवाडीचे मंगेश धोंडीराम दगडे यांच्या एका कृषी केंद्रासमोर लावलेल्या दुचाकीचा चुराडा केला. रस्त्यालगत थांबलेल्या राणी सुरेश पवार यांना टँकरने उडविले.या घटनेत ही महिला गंभीर जखमी झाली. तर संगीता प्रकाश पवार या पती नातलगाशी संवाद साधत असल्याने दुचाकीजवळ थांबलेल्या महिलेला जोरदार धडक दिली. यामध्ये सदरची महिला हवेत दहा ते पंधरा फूट उडून खाली पडल्याने जागीच ठार झाली.

हेही वाचा- २०२३ मध्ये ‘हे’ २४ दिवस बँक असणार बंद! महाराष्ट्र सरकारने सार्वजनिक सुट्ट्यांचं पत्रक केलं जारी, पाहा

या घटनेदरम्यान चौदा चाकी टँकरच्या मागील दोन चाकाची जोडी ट्रकच्या जॉईट मधून निसटली. ती वेगाने सचिन राजमाने यांच्या दुकानाच्या समोरील ब्रह्मचैतन्य चहा सेंटरच्या पाठीमागील दगडी भिंतीला जाऊन धडकली.त्यामुळे ही भिंत कोसळली. अपघातानंतर टँकर चालकाने कराड पंढरपूर रस्त्याने शेनवडीच्या (ता.माण) दिशेने पळ काढला. परंतु गावातील तरुणांनी पाठलाग करून चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

Story img Loader