मुंबई येथील अरबी समुद्रात ओएनजीसीच्या सागर किरण या तळावर हेलिकॉप्टरची एमर्जन्सी लँडिंग करण्यात आली. दोन पायलट आणि सात प्रवासी या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. मात्र अचानकपणे ओएनजीसीच्या तळावर हे विमान उतरवण्यात आलं. यातील सर्व प्रवाशांना रेस्क्यू करण्यात यश आलं असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
मिळालेल्या माहितीनुसार एक हेलिकॉप्टर अरबी समुद्राहून उड्डाण करत होते. मात्र त्याचे ओएनजीसीच्या एका तळावर एमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. त्यानंतर मुंबई शहरापासून काही अंतरावर हे लँडिंग झाल्यामुळे बचावकार्यासाठी येथे तातडीने एक जहाज पाठवण्यात आले. तसेच ओनजीसीनेदेखील आपले बचाव पथक तातडीने पाठवून प्रवाशांची सुखरुप सुटका केली.
First published on: 28-06-2022 at 15:18 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ongc helicopter carrying 7 passengers and two pilots made emergency landing in mumbai arabian sea prd