लोणंदच्या आठवडा बाजारात गरव्या कांद्याचे भाव चारशे ते पाचशे रुपये िक्वटलपर्यंत खाली घसरले. यावर्षी कांद्याचे भाव ८० रुपये किलोपर्यंत वाढलेले असताना कालच्या आठवडा बाजारात ४०० ते ५०० प्रति क्विटल रुपयांपर्यंत खाली आल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.
कांदा विकून त्यातून उत्पादनखर्च ,बारदान पिशवी, वाहतूक खर्च निघत नसल्याने बाजारात चिंतेचे वातावरण होते. लोणंदच्या बाजार आवारात दर गुरुवारी आणि सोमवारी कांद्याचे लिलाव होत असतात. यावर्षी किमान बाराशे ते पंधराशे प्रति क्विटलपर्यंत भाव मिळतील अशी शेतकऱ्यांची धारणा होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Onion prices fall
Show comments