सोलापूर : कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक अपेक्षेप्रमाणे वाढल्याने दरामध्ये घसरण झाली आहे. आठवड्यापूर्वी कांद्याला प्रतिक्विंटल कमाल दर सात हजार रुपये मिळत होता. तो आता दोन हजार रुपयांनी घसरला आहे.

गेल्या ऑक्टोबर व नोव्हेंबरपासून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होत आहे. सध्या दररोज सरासरी ४५ हजार क्विंटल लाल कांद्याची आवक होत आहे. या कांद्याला प्रतिक्विंटल कमाल दर पाच हजार रुपये, तर स्थिर सर्वसाधारण दर तीन हजार रुपयांपर्यंत मिळत आहे. दररोज कांद्याची आवक जवळपास सारखीच असताना भाव मात्र पडले आहेत. त्यामुळे कांदाउत्पादक नशिबाला दोष देत आहे.

Farmers in Washim district are cultivating chia crop along with traditional crops
वाशीम जिल्ह्यात पीक लागवडीच्या नव्या वाटा; ‘या’ पिकाला मिळतोय चांगला भाव
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
india recorded highest cultivation of wheat rabi crop sowing exceeds 632 lakh hectares
यंदा गहू मुबलक; देशात उच्चांकी लागवड; रब्बी पेरण्या ६३२ लाख हेक्टरवर; पोषक वातावरणाचा परिणाम
overseas debt become expensive due to the depreciating rupee
रुपयाच्या अवमूल्यनामुळे परदेशातून कर्ज उभारणी महाग
tur dal cost decrease by rs 50 per kg other pulses price drop
तूरडाळ किलोमागे ५० रुपयांनी स्वस्त
shortage of Wheat flour companies
पीठ कंपन्यांना जाणवतोय गव्हाचा तुटवडा; जाणून घ्या, अन्न महामंडळाची भूमिका किती महत्त्वाची
Markets uneasy over concerns of GDP slowdown print eco news
‘जीडीपी’ मंदावण्याच्या चिंतेने बाजारात अस्वस्थता
India GDP growth rate
भारताचा जीडीपी विकासदर मंदावण्याचा अंदाज चिंताजनक, पण धक्कादायक नाही! असे का?

हेही वाचा – बोट दुर्घटनेनंतर प्रशासनाकडून जाग, प्रवासी बोटींची सुरक्षा तपासणी जल प्रवास करतांना लाईफ जॅकेटची सक्ती

आठवड्यापूर्वी बाजार समितीमध्ये विक्रीसाठी दाखल झालेल्या कांद्याला सर्वसाधारण दर ३३०० रुपये आणि कमाल दर सात हजार रुपये होता. त्यानंतर त्यात घसरण होत गेली. सर्वसाधारण स्थिर दर कधी २७०० रुपये, तर कधी त्यापेक्षा कमी म्हणजे केवळ १८०० रुपये मिळत असल्याचे दिसून येते. कमाल दरही सात हजार रुपयांवरून सहा हजार, नंतर पाच हजार रुपये मिळाला असताना, त्यात पुन्हा घसरण कायम राहिली. कमाल दर ४२०० रुपयांपर्यंत मिळाल्याचे दिसून येते. काल बुधवारी कमाल दरात किंचित सुधारणा होऊन प्रतिक्विंटल पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण स्थिर दर तीन हजार रुपये इतका होता.

हेही वाचा – Sunil Tatkare : केंद्रातील मंत्रिपद सुनील तटकरेंना मिळणार की प्रफुल्ल पटेलांना? तटकरेंनी स्पष्ट केली भूमिका

कांदा दराची घसरण सुरूच असल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडू लागले आहे. कांदा लागवडीचा खर्च वजा जाऊन हाती काहीच पडत नसल्यामुळे शेतकऱ्यांमधून प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांच्या कांद्याला अत्यल्प दर मिळत असताना बाजारात कांद्याचे किरकोळ दर जवळपास चौपट आहेत. यात कष्टकरी शेतकऱ्यांपेक्षा छोटे-मोठे व्यापारीच नफा मिळवत असल्याचे दिसून येते.

Story img Loader