सावंतवाडी : बांदा ते दाणोली या आंतरराज्य आणि सह्याद्री पट्ट्यातील १६. ३० किलोमीटर अंतरावरील रस्त्याच्या ९७. २ कोटी खर्चाच्या कामाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन झाले. मात्र रस्त्यावर बावळट येथे प्रत्यक्षात शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या उपस्थितीत होणारे भूमिपूजन पहाटे मंडप जाळून व उखडून टाकत लोकांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान केसरकर यांनी सर्व संबंधितांची समजूत काढली तर मंडप जाळल्याने स्वतः नुकसान भरपाई दिली.

सह्याद्रीच्या पट्ट्यातील दाणोली – बांदा रस्त्याचे दुपदरीकरण आणि मजबुतीकरण कामाचे शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या उपस्थितीत ऑनलाईन भूमिपूजन झाले. मात्र या रस्त्यासाठी घरे व जमीन जाणाऱ्या ग्रामस्थांना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून विश्वासात घेऊन नुकसान भरपाई देण्यात न आल्याने काही ग्रामस्थांनी भूमी पूजनासाठी सातोळी बावळट येथे  उभारलेला मंडप आज शुक्रवारी पहाटे उखडून टाकला तसेच काही मंडपाचा भाग जाळूनही टाकला.

cm eknath shinde
…विकास हाच आमचा अजेंडा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्ट प्रतिपादन
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Raju Patil Sandeep Mali
राजकिय वातावरण गढूळ करणाऱ्या शिंदे पिता-पुत्राचे राजकारण संपविण्याची वेळ आली आहे; मनसे आमदार राजू पाटील यांची संतप्त प्रतिक्रिया
maharashtra assembly election 2024 ncp participation in power was certain with shinde rebellion ajit pawar
शिंदे यांच्या बंडाच्या वेळीच राष्ट्रवादीचाही सत्तेत सहभाग निश्चित; अजित पवार यांचा गौप्यस्फोट
airoli vidhan sabha marathi news
ऐरोलीतील बंडोबांना शिंदे सेनेचे अभय ?
Eknath Shinde allegation regarding Mahavikas Aghadi manifesto Jalgaon news
महाविकास आघाडीने जाहीरनामा चोरला; एकनाथ शिंदे यांचा आरोप
eknath shinde comment ladki bahin yojana daryapur vidhan sabha
मुख्‍यमंत्री म्हणतात, मी शंभरवेळा तुरूंगात जाण्‍यास तयार…कारण…
Shrikant Shinde vs mns raju patil
कल्याण ग्रामीणमध्ये श्रीकांत शिंदे – राजू पाटील यांच्यातील संघर्ष टोकाला

हेही वाचा >>> लातूर ग्रामीण भाजपात अंतर्गत गटबाजी विकोपाला; कव्हेकरांच्या निलंबनाची प्रदेशाध्यक्षांकडे मागणी

या पार्श्वभूमीवर मंत्री दिपक केसरकर यांनी जोपर्यत  ग्रामस्थांच्या शंकांचे निराकरण होत नाही तोपर्यंत या महामार्गाचे काम सुरू करण्यात येऊ नये असे स्पष्ट निर्देश शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यानी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले तसे लेखी पत्र हे सार्वजनिक बांधकाम विभागाने ग्रामस्थांनाही दिले.

तालुक्यातील दाणोली ते बांदा या राष्ट्रीय महामार्गाच्या तब्बल १६.३० किलोमीटर लांबीच्या दुपदरी आणि काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन आज सकाळी अकरा बाबता सातोळी बावळाट येथे ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आले होते. त्यासाठी ९७.२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. सदरचा रस्ता दूपदरीकरण असल्याने त्याची रुंदी वाढणार आहे.यामध्ये सातोळी बावळट ग्रामस्थांची २५ घरे तसेच जमीन बाधित होणार आहे. रस्त्याचे काम करण्याआधी घरे व जमीन बाधित होणाऱ्या ग्रामस्थांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांची होती. परंतु ग्रामस्थांना भरपाई न देता भूमिपूजन करून या रस्त्याचे काम सुरू करण्याचा घाट सार्वजनिक बांधकाम विभागाने घातला होता. यासाठी स्थानिक पातळीवर सातोळी बावळट येथे बांधकाम विभागाने भूमिपूजनासाठी मंडप उभारला होता. याची कल्पना स्थानिक ग्रामस्थांना मिळताच त्यांनी याला विरोध केला.

हेही वाचा >>> Satara Assembly Constituency: साताऱ्यात शिवेंद्रराजे भोसले यांच्या विरोधात कोण? शरद पवारांच्या रणनीतीकडे लक्ष

आज शुक्रवारी पहाटेच्या सुमारास उभारलेला मंडप अज्ञाताकडून उखडून टाकला तर  काही मंडपाचा भाग जाळण्यातही आला. भूमिपूजनाचा हा कार्यक्रम शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार होता. परंतु ग्रामस्थांचा विरोध आणि मंडप जाळण्यात आल्याचा प्रकार मंत्री केसरकर यांची कानावर येतात त्यांनी भूमिपूजनाची जागा बदलून ऑनलाईन भूमिपूजनाचा कार्यक्रम माडखोल साई मंदिरात घेतला त्यावेळी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला ग्रामस्थांच्या शंकांचे निरासन होत नाही तोपर्यंत काम करू नये अशा सूचना दिल्या. या ठिकाणी माजी आमदार राजन तेली उपस्थित होते.या कार्यक्रमाला सातोळी बावळट सरपंच सोनाली परब, उपसरपंच स्वप्नील परब, दया परब ग्रामस्थ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली.

या दुपदरीकरण कामामध्ये २५ घरे व जमीन बाधित होत असताना शासनाकडून भरपाई देण्यात आली नाही आणि काम सुरू करण्याचा घाट घातला आहे. नुकसान भरपाई चे ग्रामस्थांची मागणी असताना कामाच्या बजेटमध्ये नुकसान भरपाई बाबत काहीच तरतूद करण्यात आलेली नाही हे चुकीचे असल्याचे सांगितले. त्यामुळे जोपर्यत नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत आम्हा ग्रामस्थांचा या कामाला स्पष्ट विरोध आहे अशी भूमिका मांडत सार्वजनिक बांधकाम विभागाने ग्रामस्थांची किंवा ग्रामपंचायतीची परवानगी न घेता मंडप उभारला हे योग्य नाही असे सांगितले. नुकसान भरपाई देत नसल्यास सद्यस्थितीत जेवढा रस्ता आहे तेवढ्यात रस्त्यांच्या रुंदीमध्ये हे काम करण्यात यावे असेही स्पष्ट केले.

या कार्यक्रमाला साईमंदिरात मंत्री केसरकर यांच्यासोबत माजी आमदार राजन तेली शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख बबन राणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता वैभव सगरे आदी उपस्थित होते.

केसरकरांनी दिली भरपाई..

ऑनलाइन भूमिपूजन कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह राज्यस्तरीय मंत्री उपस्थित राहणार असल्याने बावळट  येथे मोठा मंडप उभारण्यात आला होता. ग्रामस्थांचा विरोध असल्याने हा मंडप अज्ञाताकडून उकडून जाण्यातही आला. यामध्ये मंडप मालकाचे मोठे नुकसान झाले. या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेत मंत्री दिपक केसरकर यांनी नुकसान भरपाई म्हणून मंडप मालक लक्ष्मण वरक याला ६० हजार रुपयांचा स्वतः धनादेश तात्काळ सपुर्त केला.