जागतिक वारसा म्हणून प्रसिध्द पावलेल्या कासचे पुष्प पठार सुटीच्या काळात पर्यटकांनी फुलून गेले आहे. हे पठार पर्यटकांसाठी खुले झाले असून पर्यटकांनी निराशा टाळण्यासाठी ऑनलाईन बुकिंग करावे, असे आवाहन वनाधिकारी यांनी केले. नियोजनासाठी यंत्रणा सज्ज असल्याचे उपवनअधिकारी अनिल अंजलकर यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पठार पाहण्यासठी सशुल्क व्यवस्था करण्यात आली आहे. एकाच दिवशी सुमारे तीन हजार पर्यटकांनी ऑनलाईन बुकिंग केले होते.गेल्या वषी सुमारे पाच लाख पर्यटकांनी या पठाराला भेट दिली होती. राज्यातून येणाऱ्या पर्यटकांची गरसोय होऊ नये म्हणून वन विभागाने ऑनलाईन बुकिंगची व्यवस्था केली आहे. गर्दीचे नियंत्रण व्हावे तसेच पर्यावरणाचे संरक्षण व्हावे यासाठी ही सोय अवलंबली असून या परिसरातील गावांच्या विकास कामासाठी प्रवेश शुल्काचा निधी वापरला जातो. यात वाहनांसाठी तसेच पर्यटकांसाठी शुल्क आकारले जाते त्याचबरोबर छायाचित्रणासाठीही शुल्क आकारले जाते. कास पठारावरील फुलांची माहिती देण्यासाठी १५ जणांच्या गटाला मार्गदर्शकाची व्यवस्था सशुल्क करण्यात आली आहे. या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन अंजलकर यांनी केले आहे

पावसाच्या प्रमाणात नियमितता निर्माण झाली त्याचा परिणाम कास पठारावरील फुलांच्या बहरण्यात झाला. पठारावरील फुलांच्या संदर्भात अभ्यासकांचे मत विचारले असता त्यांनी सांगितले, कास पठारावरील दगडांची माती झाल्यावर त्या मातीतच निर्माण होणाऱ्या   गवतात ही फुले निर्माण होतात.

पावसानंतर कडक ऊन व नंतर पुन्हा पावासने ही फुले बहरतात. तशी ती सध्या बहरली आहेत. साधारणपणे या पठारावर १७५ ते १८० फुलांच्या प्रजाती पाहण्यास मिळतात. त्यातही पावसाळ्याच्या सुरुवातीला वायतुरा ही प्रजाती येऊन गेली आहे. सीतेची आसवे, कंगवा, िपडा, कवळा इत्यादी जाती पाहण्यास मिळतात.

गणपतीच्या काळात फुले बहरलेली होती. सध्या पठारावर तेरडय़ाची लाल गुलाबी मोहक छटा अनुभवावयास मिळत आहे. त्यासोबतच चेंडूच्या आकाराचे गेंद (ईरिओकोलोन) व शिकारी फूल म्हणून ओळख असणारी सीतेची आसवे यांची पांढऱ्या-निळ्या रंगाची उधळण सुरू झाली आहे. या आठवडय़ात परतीच्या पावसाने आधार दिल्याने फुलांचा गालीचा सजण्यास काहीच हरकत नाही. त्यामुळे फुलांचा हंगाम ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत तरी चालेल असे तज्ञांचे म्हणणे आहे. सध्या कीटक भक्षी इंडिका डासेरा व इंडिका बरमानी, निलिमा, अबोलिमा, निळी काळी व पांढरी निर्सुडी, कापरू, भुईशिर्ड, दगड फूल, हळुंदा, पिंडा, वायतुरा आदी अनेक फुले पाहायला मिळतील.

प्रत्येक वर्षी गर्दीचा उच्चांक मोडणारे साताऱ्यातील कास पुष्प पठार हे पर्यटकांना खुले होणार आहे. जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाल्याने या वर्षी किती पर्यटक येणार याची उत्सुकता सातारकरांना लागली आहे.

पठारावर येणाऱ्या पर्यटकांना ऑनलाईन बुकिंग करावे लागेल त्यासाठी ६६६.‘ं२.्रल्ल.्रिल्ल या संकेतस्थळावर आगाऊ नोंदणी करावी. सुटीच्या दिवशी होणारी गर्दी व वाहनांची गर्दी-कोंडी लक्षात घेऊन तीन हजार पर्यटकांनाच प्रवेश देण्यात येणार आहे.प्रवेश शुल्क तसेच इतर सर्व माहिती संकेतस्थळावर दिली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Online booking for kas pathar flower valley