बौद्धिक क्षमता वाढीसाठी भगिनी समाज शाळेचा उपक्रम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निखिल मेस्त्री, लोकसत्ता

पालघर : टाळेबंदीत विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेत वाढ व्हावी, अभ्यासू वृत्ती निर्माण व्हावी यासाठी पालघर शहरातील प्राथमिक विद्यामंदिर भगिनी समाज शाळेतील शिक्षकांनी ऑनलाइन  चाचणी घेणारा अनोखा उपक्रम सुरू केला आहे.  या चाचणीला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

शाळेतील उपक्रमशील शिक्षक यांच्यामार्फत तयार करण्यात आलेल्या  चाचण्या  Testmoze.co या लिंकवरून प्रश्न निर्मिती चाचण्या तयार करून त्याची लिंक इयत्ता १ ली ते ७ वी पर्यंतच्या वर्गानुसार पालकांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर ती प्रसारित केली जात आहे.

दिलेल्या लिंक क्लिक केल्याबरोबर चाचणीचे पान समोर येते. त्यात विद्यार्थ्यांने आपले पूर्ण नाव लिहून चाचणी सोडविण्यास सुरुवात करता येते. यामध्ये १० ते १५ प्रश्नांची चाचणी उपलब्ध आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल व सामान्य—ज्ञान तसेच व्याकरणावर आधारित मूलभूत क्षमताधिष्ठित संकल्पनेवर घटकनिहाय प्रश्नांची चाचणी आधारित आहे.

या चाचणीत वस्तुनिष्ठ प्रश्नावलींची बहुपर्यायी उत्तरे दिलेली आहेत. त्यातील अचूक उत्तर निवडून चाचणी सोडवल्यावर र४्रुे३ बटन दाबल्यावर विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या प्रश्नांची बरोबर उत्तरे व चुकलेली उत्तरे पाहावयास मिळतात.

विशेष म्हणजे या चाचणीत दिलेल्या प्रश्नांमधील चुकलेल्या उत्तरांची अचूक उत्तरे पाहण्याची सुविधा आहे. तसेच चाचणीचा निकालही टक्केवारीमध्ये पाहायला मिळतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना या चाचण्या सोडविताना पाहून पालकांना आनंद होत आहे.

या अभिनव उपक्रमांबद्दल संस्थेचे पदाधिकारी व शाळेच्या मुख्याध्यापिका प्रीती वर्तक तसेच सर्व  उपक्रमशील शिक्षकांचे परिसरातून कौतुक होत आहे.

शिक्षकांमार्फत चाचणी संच बनवून ते पालकांच्या ‘व्हॉट्सअ‍ॅप’ ग्रुपवरून प्रसारित केल्या जात आहेत. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळे विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढण्यास मदत होते. विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासातच आम्हाला आनंद आहे.

– प्रीती वर्तक, मुख्याध्यापिका

टाळेबंदीत शाळेने असे ऑनलाइन चाचणी उपक्रम सुरू केल्याने आमच्या मुलांचे शिकणे हे सुरूच आहे. ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर चाचणी सोडवताना मुलांना व आम्हालादेखील खूप आनंद होत आहे.

– स्मिता पाटील, पालक