अंतिम सोडून अन्य परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. UGC ने दिलेल्या निर्देशांनुसार सगळे निर्णय घेण्यात येत आहेत असंही उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. BA हा तीन वर्षांचा कालावधी आहे त्यात सहा सेमीस्टर असतात. त्यातल्या सहाव्या सेमीस्टरची परीक्षा घेणार. बीकॉमचंही तसंच असणार आहे. जिथे ८ सेमीस्टर आहेत तिथे आठव्या सेमीस्टर होणार, १० सेमीस्टर असतील तिथे १० व्या सेमीस्टरची परीक्षा घेणार आहोत. MA, एमकॉम आणि इतर २ वर्षांचा कोर्स आहेत चार सेमीस्टर आहेत तिथे चौथ्या सेमीस्टरची परीक्षा होणार आहे. डिप्लोमाचा कालावधी तीन वर्षांचा आहे. कालावधी सहा सेमिस्टरचा आहे. सहाव्या सेमीस्टरची परीक्षा होईल असंही सामंत यांनी स्पष्ट केलं.

सर्व विद्यार्थ्यांना नवीन वर्गात प्रवेश मिळणार, मात्र नापास झालेले विषय पुढील परीक्षेत उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षा या १ ते ३१ जुलै दरम्यान होतील. मात्र लॉकडाउनची स्थिती कायम राहिल्यास २० जूनच्या आसपास बैठक घेऊन अंतिम निर्णय होईल असंही उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. आधी कमी गुण मिळाले असतील तर ऐच्छिक परीक्षा देण्याचीही मुभा देण्यात आली आहे. पदवीच्या केवळ अंतिम वर्षांचीच परीक्षा होणार आहे असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं.

Story img Loader