Open Heart Surgery छत्रपती संभाजी नगर येथील छत्रपती संभाजी महाराज नगर सुपर स्पेशालिटी रुग्णालयात एक हृदय शस्त्रक्रिया पार पडली. ही शस्त्रक्रिया साडेचार तास सुरु होती. १४ वर्षीय मुलाच्या हृदयातील छिद्र या शस्त्रक्रियेत ( Open Heart Surgery ) बंद करण्यात आलं. या १४ वर्षीय मुलाची प्रकृती आता चांगली आहे अशी माहिती डॉ. शिवाजी शुक्रे यांनी दिली.
हृदय बंद करुन शस्त्रक्रिया
१४ वर्षांच्या या मुलाचं हृदय शस्त्रक्रिया ( Open Heart Surgery ) करताना बंद करण्यात आलं होतं. हार्ट लंग मशीनच्या मदतीने शरीरात रक्त आणि ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवण्यात आला होता अशी माहितीही डॉ. शुक्रे यांनी दिली आहे.
तीन सेमीचे छिद्र बंद करण्यात आलं
१४ वर्षीय रुग्णाच्या हृदयात तीन सेंटीमीटरचं छिद्र होतं जे शस्त्रक्रिया करुन बंद करण्यात ( Open Heart Surgery ) आलं आहे. या शस्त्रक्रियेसाठी साधारणतः तीन लाख रुपयांचा खर्च येतो मात्र हे सरकारी रुग्णालय असल्याने ही शस्त्रक्रिया मोफत झाली. गरीब रुग्णांना उच्च दर्जाची वैद्यकीय सुविधा मिळावी या हेतूने केंद्र आणि राज्य सरकारच्या आर्थिक सहाय्याने घाटी रुग्णालय परिसरात १५० कोटी रुपये खर्चून सुपर स्पेशालिटी इमारत उभारण्यात आली आहे. या रुग्णालयात कोट्यवधींची यंत्रसामुग्रीही खरेदी करण्यात आली आहे अशीही माहिती डॉ. शुक्रे यांनी माध्यमांना दिली. १४ वर्षीय मुलावर अॅट्रियल सेप्टल डिफेक्ट अर्थात ASD ची शस्त्रक्रिया करण्यात आली. यासाठी साडेचार तासांचा कालावधी लागला. दीड तास रुग्णाचं हृदय बंद ठेवून या मुलाला जीवदान देण्यात आलं.
सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारल्यापासूनची पहिली शस्त्रक्रिया
छत्रपती संभाजी नगरच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात पहिली एसएडी या आजाराची शस्त्रक्रिया ( Open Heart Surgery ) करण्यात आली. हा १४ वर्षांचा रुग्ण मागील शुक्रवारपासून या ठिकाणी दाखल होता. डॉ. सदानंद पटवारी, डॉ. ज्योती कुलकर्णी यांच्या मदतीने आम्ही ही आव्हानात्मक शस्त्रक्रिया पूर्ण केली. प्रमोद अपसिंगेकर, डॉ. शीतल ढिकले, डॉ. हुसैन या सगळ्या टीमने ही आव्हानात्मक असणारी शस्त्रक्रिया पूर्ण केली आहे. चार तास ही शस्त्रक्रिया सुरु होती. आम्ही रुग्णाला आता ऑपरेशन थिएटरमधून बाहेर काढलं आहे आणि त्यांची प्रकृतीही व्यवस्थित आहे अशी माहिती डॉ. शुक्रे यांनी दिली.