Ayodhya Poul Operation : ठाकरे गटाच्या तडफदार सोशल मिडिया राज्य समन्वयक अयौध्या पौळ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियापासून दूर होत्या. विविध राजकीय घटनांवर थेट मते मांडणाऱ्या पौळ (Ayodhya Poul) यांनी गेल्या काही दिवसांत एकही ट्वीट केलेलं नाही. परंतु, त्यांच्या प्रकृतीविषयी आता बातमी समोर आली आहे. यासंदर्भात त्यांनीच एक्स पोस्ट केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अयोध्या पौळ (Ayodhya Poul) पाटील म्हणाल्या, “गर्भाशयाच्या आजारामुळे तुम्हा सर्वांना सोशल मीडियावर दिसले नव्हते आणि खूप जणांचे फोन घेता आले नाही.. ऑपरेशन झालं. रिकव्हर होत आहे. लवकरच लिहीते आजाराबद्दल. डिस्चार्जच्या दिवशी दवाखान्यातील नर्स ताईने काढलेले फोटो.”

हेही वाचा >> हेमंत पाटील यांचं तिकिट कापलं गेल्यावर अयोध्या पौळ यांची खोचक पोस्ट, “जसा माझा श्रीकांत तसा हेमंत..”

लोकसभा निवडणुकीच्या आधी एप्रिल महिन्यात अयोध्या पौळ पाटील यांनी एक ट्वीट करून खळबळ उडवली होती. कल्याण लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर केल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यावरून बरीच चर्चाही रंगली होती. परंतु, त्याच दिवशी त्यांनी यासंदर्भातील खुलासा करून एप्रिल फूल केल्याचं जाहीर केलं. तर, भाजपाच्या अनेक महिला नेत्यांशी त्या उघड पंगा घेतात. त्यांच्यावर थेट टीका करतात, त्यामुळे अयोध्या पौळ सतत चर्चेतही असतात. परंतु, त्यांच्या या आजारपणामुळे त्या सोशल मीडियापासून लांब होत्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Operation on ayodhya poul cause uterus problem sgk
Show comments