केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या गुरुवारपासून सुरू होणाऱ्या जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून भाजपाकडून शक्तिप्रदर्शन केले जात आहे. नारायण राणे यांचे गुरुवारी सकाळी ११ वाजता मुंबई विमानतळावर आगमन झाले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन-आशिर्वाद यात्रेला आजपासून मुंबईतून सुरूवात झाली आहे. होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला हार अर्पण करुन यात्रेला केली. माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जन-आशिर्वाद यात्रेला हिरवा झेंडा दाखवला. बहुजनांचं राज्य हे मोदींमुळे बघायला मिळत आहे असे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटले.
“जन आशिर्वाद यात्रेला वरुण राजाचाही आशिर्वाद मिळालेला आहे. तसंही राणेसाहेबांची यात्रा म्हटल्यानंतर ती साधी यात्रा होऊ शकत नाही. वरुण राजाच्या आशिर्वादाने सुरु झालेली यात्रा महाराष्ट्रातल्या, मुंबईतल्या प्रत्येक जना जनाचा आशिर्वाद घेऊन मोदीजींच्याप प्रति कृतज्ञता प्रगट करुन ही यात्रा जाणार आहे,” असे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
“बहुजनांचं राज्य हे मोदींमुळे बघायला मिळत आहे. देशातले जे कर्तृत्ववान लोकं मोदींनी निवडून घेतले त्यामध्ये राणेसाहेबांना अत्यंत महत्त्वाची जबाबदारी मिळालेली आहे,” असे फडणवीस म्हणाले.
“८० टक्के उद्योग हे राणे यांच्या खात्याअंतर्गत येतात, देशाचा जीडीपी हा विभाग ठरवतो. महाराष्ट्रमध्ये आज जे सरकार आपल्याला पाहायला मिळत आहे या सरकारच्य नेतृत्वामध्ये महाराष्ट्राची अधोगती सुरू आहे हे मी सांगण्याची गरज नाही. हा महाराष्ट्र गेल्या ५ वर्षामध्ये गुजरातला मागे सोडून देशातल्या पहिल्या नंबरचे राज्य झालं होतं. सर्वाधिक औद्योगिक गुंतवणूक राज्यात येत होती, पण गेल्या २ वर्षामध्ये महाराष्ट्राचा पहिला नंबर गेला आणि बाकीची राज्ये पुढे चालली आहेत. ज्याप्रकार सरकारी स्तरावर वसुली सुरू आहे त्यासाठीआता संघर्षाशिवाय पर्याय नाही, जनतेसाठी संघर्षं केल्याशिवाय पर्याय नाही,” असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. जनतेचा आशा आकांक्षा या मोदींपर्यंत या यात्रेच्या माध्यमातून पोहचवल्या जातील असेही फडणवीस म्हणाले.
“मोदींच्या आशीर्वादानेच मी मंत्री”- नारायण राणे https://t.co/FcFRAiIHHN < येथे वाचा सविस्तर वृत्त #Mumbai #JanAshirwadYatra #NarayanRane #PMModi #AmitShah @MeNarayanRane @BJP4India pic.twitter.com/t2RTqP9DCQ
— LoksattaLive (@LoksattaLive) August 19, 2021
यात्रेदरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे हे स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, चैत्यभूमी येथील डॉ. बाळासाहेब आंबेडकर स्मारक, शिवाजी पार्क येथील हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन करणार आहेत.