गोवा भाजप सरकारच्या अडेलतट्टू धोरणामुळे सागरी मार्गावरील आरोंद्रा-किरणपाणी पुलाच्या गोवा रस्त्यावर भला मोठा खड्डा पाडून भाजप आमदाराने पूल वाहतूक खुली करण्यास विरोध दर्शविला असल्याचे उघड झाले आहे. यासंदर्भात महाराष्ट्र व गोवा राज्य सरकार बांधकाम अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे.
महाराष्ट्र व गोवा राज्यांना जोडणारा सागरी महामार्गावरील आरोंदा किरणपाणी पुलाची स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्र सरकारने मागणी पूर्ण केली. गेली सहा वर्षे या पुलाचे बांधकाम सुरू आहे. आता अंतिम टप्प्यात काम असून, बांधकाम मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटनाच्या प्रतीक्षेत हा पूल आहे.
या पुलाचा खर्च महाराष्ट्र सरकारने केला आहे. या पुलाचे जोड रस्ते दोन्ही सरकारनी आपापल्या हद्दीतील करावयाचे ठरले होते. त्यानुसार महाराष्ट्र सरकारने जोड रस्तेही पूर्ण केले, पण गोवा सरकारने मेच्या सहा वर्षांत जोड रस्त्यासह अन्य कामांना प्राधान्य दिलेले नसल्याचे बोलले जात आहे.
महाराष्ट्र व गोवा राज्यांना जोडणाऱ्या किरणपाणी पुलामुळे सागरी महामार्गाचा जवळचा प्रवास होऊन आर्थिक बचतही होणार आहे. त्या भागातील लोकांना दोन्ही राज्यांतील भागांत प्रवास शक्य झाला आहे.
या पुलाच्या गोवा राज्यातील भागातील रस्त्याची कामे झालेली नाहीत. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यास अपघात धोकाही होऊ शकतो, असे तेथील जनतेचे म्हणणे आहे. त्या भागातील भाजप आमदाराने ही व्यथा मांडून बांधकाम अधिकाऱ्यांची बैठकही बोलाविली आहे. या किरणपाणी पुलाच्या गोवाकडील रस्त्यावर भला मोठा खड्डा मारून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पूल वाहतुकीस खुला होत असला तरी गोवा सरकारने या पुलावरून प्रवेश बंदीचा धोका निश्चित करून महाराष्ट्र सरकारची आडमुठे धोरण अवलंबिले असल्याचे समजते.

Story img Loader