उद्यापासून (सोमवार) सुरु होणारे हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी मराठा आरक्षण, दुष्काळी मदत आदी अनेक मुद्यांवरुन सरकारला धारेवर धरले. आमीर खान, अमिताभ बच्चन यांचा ठग्ज ऑफ हिंदोस्तान जनतेने फ्लॉप केला आहे. मागील ४ वर्षांपासून महाराष्ट्रात ठगबाजी सुरु आहे. राज्यातील जनता या ‘ठग्ज ऑफ महाराष्ट्राला’ या भुईसपाट करेल, असा टोला विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी लगावला. तर विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दुष्काळाबाबत सरकार गंभीर नसल्याचा आरोप करत शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची घोषणा करा, अन्यथा अधिवेशन चालू देणार नसल्याचा इशाराही दिला. त्याचबरोबर मराठा आरक्षणाचा अहवाल सोमवारीच सभागृहात मांडला पाहिजे, अशी आग्रही मागणीदेखील त्यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आले. दरम्यान, विरोधकांनी सरकारच्या चहापानावरही बहिष्कार घातला.

विखे-पाटील म्हणाले, राज्यात शेतकऱ्यांची दुरावस्था असताना मुख्यमंत्री काहीतरी क्रांतीकारी काम केल्याचा आव आणत आहेत. शेतकरी कर्जमाफी झाल्याचे हे सांगतात. पण अजून ५० टक्के कर्जमाफीही झाली नसल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवल्याचे मुख्यमंत्री सांगतात. पण ऑक्टोबरपर्यंत राज्यात तब्बल २३०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. स्वत:च्या सरणावर आत्महत्या करण्याचा राज्यात पहिल्यांदाच प्रकर घडला आहे.

हे सरकार बाता मारत आहे. १९७२ पेक्षाही वाईट परिस्थिती आहे. संपूर्ण खरीप पीक वाया गेले आहे. परतीचा पाऊस झालेला नाही. रब्बीचा पेरा होणे शक्य नाही. आत्ताच टँकर सुरु झाले आहेत. टँकरच्या संख्येत आणखी वाढ होईल. या सरकारने दुष्काळी मदत जाहीर करण्यास विलंब केला. फळबागांना १ लाख हेक्टरी मदत केली जावी, अशी मागणी त्यांनी केली.

राम मंदिराच्या नावाने उद्धव ठाकरेंनी नवीन ठगबाजी सुरु केला आहे. राम मंदिर तुम्ही बांधता का आम्ही बांधू असे, उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात गर्जना केली होती. ते नेहमीच गर्जना करतात. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन होऊन ६ वर्षे झाली. पण मागील चार वर्षांत त्यांना बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक उभारता आलेले नाही. खरंतर मातोश्रीतच स्मारक व्हायला हवे होते. शिवसेनेचा अजेंडाच पूर्णपणे बदलला आहे. आता त्यांना ‘राम राम’ म्हटल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.

दरम्यान, धनंजय मुंडे यांनीही सरकारवर हल्लाबोल केला. दुष्काळाबाबत सरकार गंभीर नाही. शेतकऱ्यांना तात्काळ मदतीचे घोषणा करा, अन्यथा अधिवेशन चालू देणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला. त्याचबरोबर मराठा आरक्षणाचा अहवाल सोमवारीच सभागृहात मांडण्याची मागणी त्यांनी केली. निवडणुकीच्या काळात भाजपा-शिवसेनेला राम आणि अयोध्येची आठवण येते. यांचा वनवास निश्चित आहे. उद्धव ठाकरे यांनी अयोध्येला जाण्यापूर्वी दुष्काळी स्थिती पाहणी केली असती तर शेतकऱ्यातच त्यांना राम दिसला असता. महाराष्ट्रातील जनतेने त्यांना डोक्यावर घेतले असते, असेही ते म्हणाले.