मुंबईतील क्लस्टर योजनेबाबतची घोषणा सोमवारपर्यंत करू आणि ठाण्यातील क्लस्टरबाबत एक महिन्यात निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज (गुरूवार) विधानसभेत दिली. ठाण्यात एकत्रित पुनर्विकास योजना (क्लस्टर) लागू करण्याबाबत मुख्यमंत्री चालढकल करीत असल्याचा आरोप करीत विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला होता. या मुद्यावरून सभागृहात गोंधळ झाल्याने सभागृह अर्धा तासासाठी तहकूब करण्यात आले होते.  
एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक, राजन विचारे, प्रकाश भोईर यादी ठाण्यातील सदस्यांनी अंगामध्ये बांधकाम कामगार वापरतात ते जॅकेट घालून क्लस्टर योजना त्वरीत लागू करण्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजीसुध्दा केली. 
सामूहिक विकासाची हमी! ‘क्लस्टर डेव्हलपमेंट’वर मुख्यमंत्र्यांची मोहोर
प्रदीर्घ काळापासून चर्चेच्या गुऱ्हाळात अडकलेल्या सामूहिक विकास योजनेला (क्लस्टर डेव्हलपमेंट) अखेर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हिरवा कंदील दाखविला असून शहरातील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. अनधिकृत इमारतींमधील रहिवाशांचे या योजनेच्या माध्यमातून पुनर्वसन होणार असले तरी त्यांना त्यासाठी पैसै मोजावे लागणार आहेत. मात्र, ही घरे मोफतच मिळावीत, या मागणीसाठी ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांमध्ये एकमत असून एरवी बेकायदा बांधकामांसाठी एकमेकांच्या सुरात सूर मिसळणाऱ्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी ‘फुकट’ घरांची मागणी करत निवडणुकीचा राग आळवण्यास सुरुवात केली आहे.
फुकट घरांसाठी सर्वपक्षीय सरसावले

Story img Loader