मागील काही दिवसांपासून शिंदे गटातील नेत्यांकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करण्यात येत आहे. त्यावर विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजकारण शिवसेनेनं केलेलं नाही. ज्यांना राजकारणाची खुमखुमी आहे. त्यांना दसरा मेळाव्यात शिवतीर्थावर उत्तर मिळेल, असा इशारा दानवे यांनी दिला आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्याबाबत विचारलं असता अंबादास दानवे म्हणाले, “राज ठाकरे गेल्या लोकसभेत ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणून फिरत होते. तीन-चार महिन्यापूर्वी त्यांनी भोंग्याचा विषय काढला होता. जिथे भोंगे असतील तिथे हनुमान चालीसा लावायची. मात्र, एकाही भोंग्यासमोर हनुमान चालीसा म्हटली गेली नाही.”

हेही वाचा – “रामदास कदम चिल्लर माणूस, सरड्यापेक्षा जास्त…”; शिवसेनेची घणाघाती टीका

“राज ठाकरेंचे वर्तन…”

“महाविकास आघाडी आणि शिवसेनेला राज ठाकरे जाणीवपूर्वक विरोध करत होते. भाजपाचे ते मित्र होऊ पाहत आहेत. त्यांची भाषा, वर्तन भाजपाशी मिळते जुळते आहे. भाजपाचे लोक त्यांना भेटतात. ते भाजपाच्या लोकांकडे जातात. भाजपाची दुसरी शाखा राज ठाकरेंचा पक्ष मनसे आहे,” असा टोला अंबादास दानवे यांनी राज ठाकरेंना लगावला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opposition leader ambadas danve taunt mns leader raj thackeray ssa