“लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरे भाजपात सामील होतील”, असा दावा रवी राणा यांनी केला होता. त्यांच्या या दाव्यावर आता राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही आता रवी राणा यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
रवी राणा काय म्हणाले होते?
“मी आपल्याला सांगतो की, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोलले आहेत. मात्र, आता मी जबाबदारीने सांगतो की, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान म्हणून विराजमान झाल्यानंतर १५ दिवसांमध्ये उद्धव ठाकरे हे मोदी सरकारमध्ये असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर ते दिसतील. कारण येणारा काळ हा नरेंद्र मोदी यांचा आहे. देशाचं भविष्य उज्वल करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गरज आहे”, असं रवी राणा यांनी म्हटलं.
विजय वडेट्टीवारांची टीका काय?
“रवी राणांचं स्थान काय? लोचटपणे मागे धावणारा माणूस. न बोलावता अनेक ठिकाणी जाणारा माणूस. अनेक ठिकाणी अनेकवेळा स्वतःचा निर्णय बदलणारा माणूस. त्या माणसाला किती महत्त्व द्यायचं? त्या माणसाला अजिबात महत्त्व नाही. भाजपाच्या शिर्षस्थ नेत्यापैकी तो नाही. त्यामुळे मला त्यात काहीही तथ्य वाटत नाही”, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.
हेही वाचा >> आमदार रवी राणांचा उद्धव ठाकरेंबाबत मोठा दावा; म्हणाले, “मोदी पुन्हा सत्तेत आल्यावर १५ दिवसांत…”
महाराष्ट्रात ३५ पेक्षा जास्त जागा जिंकणार
सत्तापरिवर्तासाठी काहीच तास शिल्लक राहिले आहेत. देश सत्तापरिवर्तनासाठी उत्सूक असल्याचं वातावरण आहे. खरंतर महाराष्ट्रातील निकाल स्पष्ट आहे. बरेसचे एक्झिट पोल पुढे दाखवत असले तरीही त्यापेक्षा कितीतरी पटीने पुढे आहेत. महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रात ३५ पेक्षा कमी जागा येणार नाहीत. यात काही तथ्य नाही, सत्ताधाऱ्यांना खुश करण्यासाठी केलेला हा पोल आहे. लांगुलचालन करत आहेत. महाविकास आघाडी महाराष्ट्रात ३५ पेक्षा अधिक जागा जिंकणार आहे. आमच्या मविआचं निर्वावद वर्चस्व महाराष्ट्रात दिसेल.
हुकूमशाहाचा अस्त ठरलेला आहे
काँग्रेससाठी विदर्भातून लाट तयार झाली आहे. विदर्भात जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. सत्ताधाऱ्यांवर चिडून लोक मतदानासाठी आले होते. ही निवडणूक जनतेची आहे. विदर्भातील दहा जागा महाविकास आघाडी जिंकेल. सरकारविरोधात वातावरण असताना जर हे निकाल विचित्र लागले तर मात्र डाल में कुछ काला है. इंडिया आघाडीच्या सर्वेनुसार २९५ ते ३०० जागा मिळतील, त्यामुळे हुकूमशाहाचा अस्त ठरलेला आहे.
सी १७ आणि मशिनची टॅली करा
आम्ही सर्व ठिकाणी लक्ष ठेवून आहोत. बऱ्याच मतमोजणी केंद्रांवर एजन्टना शेवटपर्यंत अंतिम निकाल येईपर्यंत बाहेर पडायचं नाही, असं सांगितलंय. सुरुवातीलाच फॉर्म १७ टॅली केल्याशिवाय मतमोजणी करू नये अशी आग्रही मागणी आहे. एक तास लेट झाला तरी काऊंटिंग करण्यापूर्वी तपासणी व्हावी, असंही विजय वडेट्टीवार म्हणाले.