Vijay Wadettiwar : गडचिरोलीत दोन चिमुकल्या भावंडांना ताप आला आणि त्यानंतर काही तासांच्या अंतराने दोघांचाही संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. या चिमुकल्या दोन्ही भावंडांना ताप आल्यानंतर उपचारासाठी डॉक्टरांकडे घेऊन जाण्याऐवजी पुजाऱ्याकडे नेलं होतं, असंही सांगितलं जात आहे. यानंतर आई-वडिलांनी रुग्णालय गाठले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. त्यानंतर वेळेवर शववाहीका उपलब्ध नसल्याने मृतदेह खांद्यावर घेऊन जड पावलांनी १५ किलोमीटर पायपीट करत त्यांनी घर गाठले. दरम्यान, अहेरी तालुक्यातील पत्तीगाव येथील या घटनेचा व्हिड़ीओ व्हायरल झाल्यानंतर हळहळ व्यक्त होत आहे.

आता या घटनेवरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते, मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्यावर हल्लाबोल केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, तर ही घटना मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या मतदारसंघात घडली आहे. यावरून विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे. “गडचिरोली जिल्ह्यात लोकं कसे जगतात? जिवंतपणी त्यांना मिळत असलेल्या मरण यातना एकदा या इव्हेंटबाज सरकारने प्रत्यक्ष जाऊनही बघावं”, असं म्हणत विजय वडेट्टीवारांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे.

newborn babies killed jhansi marathi news
अन्वयार्थ : ‘उत्तम प्रदेशा’तल्या बाळांची होरपळ
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
pune accidents latest marathi news
पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू
One died in an accident, accident Ovala Naka,
ठाणे : अपघातात एकाचा मृत्यू, ओवळा नाका येथील घटना
passenger two-wheeler died, dumper hit Bopodi,
डंपरच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू, मुंबई-पुणे रस्त्यावरील बोपोडीत अपघात
tempo hit on Satara road, Woman died Satara road,
सातारा रस्त्यावर टेम्पोच्या धडकेत महिलेचा मृत्यू, दाम्पत्य जखमी; अपघातानंतर टेम्पोचालक पसार
passenger dies after st bus crash in swargate depot premises
स्वारगेट स्थानकाच्या आवारात एसटी बसच्या धडकेत प्रवासी तरुणाचा मृत्यू
Special campaign against Pneumonia by Zilla Parishad to prevent child death
बालमृत्यू टाळण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे न्यूमोनियाविरोधात विशेष मोहीम

हेही वाचा : गडचिरोली : चिमुकल्या मुलांचा मृतदेह खांद्यावर घेऊन आई-वडिलांची १५ किमी पायपीट…

विजय वडेट्टीवार यांनी काय म्हटलं?

“दोन्ही लेकरांचे ‘मृतदेह’ खांद्यावर घेऊन चिखलातून वाट शोधत पुढे जात असलेले हे दाम्पत्य गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील आहे. आजोळी आलेल्या दोन भावंडांना ताप आला. वेळेत उपचार मिळाले नाही. दोन तासांतच दोघांचीही प्रकृती खालावली व दीड तासांच्या अंतराने दोघांनीही अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयातून मृतदेह घरी घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका नव्हती. आई-वडिलांनी दोन्ही भावंडांचे मृतदेह खांद्यावर घेतले. चिखलातून वाट शोधत १५ किलोमीटर दूर अंतरावरचे अहेरी तालुक्यातील पत्तीगाव पायीच गाठले. गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेचे एक भीषण वास्तव आज पुन्हा पुढे आले. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री असलेला हा जिल्हा. हेलिकॉप्टरने विधानसभा मतदारसंघ पिंजून काढणारे महायुतीतील कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा हा मतदारसंघ. दोघेही महाराष्ट्रभर रोज इव्हेंट घेऊन आम्हीच कसा विकास करू शकतो हे सांगत असतात. दोघांनी एकदा जमिनीवर उतरून आपल्या गडचिरोली जिल्ह्यात लोकं कसे जगतात, जिवंतपणी त्यांना मिळत असलेल्या मरण यातना एकदा या इव्हेंटबाज सरकारने प्रत्यक्ष जाऊनही बघावे”, असं एक्सवरील (ट्विट) पोस्टमध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.