वाई : पुण्यात बांधकाम व्यवसायिक अगरवाल याच्या मुलाकडून जो अपघात घडला यानंतर मी पब आणि बारसंबंधी कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. पुण्यातील ४९ पब आणि बारवर कारवाई केली आहे. आमदार रवींद्र धंगेकर आणि अंधारे यांनी अधिक्षक कार्यालयात जाऊन हप्तेखोरी केली जाते याची यादी दिली, नावे दिली नाहीत. त्यांनी माध्यमांना घेऊन फक्त स्टंटबाजी केली असल्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी साताऱ्यात सांगितले.
सातारा येथे पत्रकारांशी बोलताना शंभूराज देसाई यांनी आमदार रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे यांच्यावर जोरदार टीका केली. कांदाटी खोऱ्यातील कोयना पुनर्वसन भागात मोठ्या प्रमाणात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पालगत, इको सेन्सिटिव्ह झोन व बफर झोन मध्ये आजी माझी सनदी अधिकाऱ्यांनी जागा खरेदी केल्या असून अनधिकृत बांधकामे ही केली आहेत याबाबत विचारले असता मी याविषयी जिल्हाधिकाऱ्यांशी आज बोललो नाही. मात्र उद्या या विषयाशी माझी त्यांची चर्चा होईल. माझी भेट झाली की तुम्हाला या बाबत माहिती देतो असे त्यांनी लोकसत्ता’ला सांगितले.
विधानसभा सदस्य असणा-यांनी थोडी शहानिशा करायला हवी होती. तुमच्याकडचे पुरावे शासनाकडे किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे द्या. सरकारवर टीका करताना पुरावा नसताना स्टंटबाजी करण्याचा हा प्रयत्न आहे. मी पदभार स्वीकारल्यानंतर सर्वात जास्त कारवाया केल्या आहेत. या प्रकरणात धंगेकरांनी वस्तुस्थिती जाणून घेण्याची गरज आहे. मात्र मोघम पद्धतीने अशी वक्तव्य करु नका असे देसाई म्हणाले. माझी नाहक प्रतिमा बदनाम कराण्याचं काम सुरू आहे
विरोधी पक्ष माध्यमांना घेऊन स्टंट बाजी करायचे काम करत आहेत.या प्रकरणात नक्की काही आहे का याचे तपास करण्याचे आदेश दिले आहेत. पाठीमागे किती कारवाई झाल्या आणि मी आल्यावर दुपटीने झाल्या आहेत. सुषमा अंधारेंनी मागे ललीत पाटील ड्रग्स प्रकणारत माझं नाव जोडलं होतं. त्यातील अब्रुनुकसानकीची न्यायालयीन प्रक्रीया सुरु आहे. मात्र त्याच्यात ही अधिकची माहिती न्यायालयाला देवुन माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न निदर्शनात आणून देऊ असे देसाई म्हणाले.
आणखी वाचा-भुजबळांच्या ‘त्या’ विधानाला फडणवीसांचं उत्तर; म्हणाले, “भाजपा सर्वात मोठा पक्ष, त्यामुळे जास्त…”
मोदींच सरकार पुन्हा येईल हा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विधानसभेसाठी तिन्ही नेते एकत्र बसून कोणाला किती जागा द्यायच्या हे ठरवतील महायुतीमधील पक्षांचा योग्य सन्मान राखला जाईल असेही शंभूराज देसाई म्हणाले.