शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी अलिकडेच महात्मा गांधी, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावर सध्या टीका सुरू आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी त्यांच्याविरोधात मोर्चे आणि आंदोलनं केली जात आहेत. अशातच संभाजी भिडेंचा मुद्दा विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गाजू लागला आहे. विरोधी पक्षांमधील नेत्यांनी, प्रामुख्याने काँग्रेस आमदारांनी आज (२ ऑगस्ट) विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान, संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी केली. भिडेंच्या मुद्यावरून विधानसभेत विरोधकांनी मोठा गोंधळ घातला. परिणामी, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याप्रकरणी बोलावं लागलं.

संभाजी भिडेंच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन केलं. देवेंद्र फडणवीस म्हणाले, अमरावतीतल्या भाषणाप्रकरणी संभाजी भिडे यांच्यावरील कारवाईला सुरुवात झाली आहे. संभाजी भिडे गुरुजींना सीआरपीसीच्या कलम ४१ अ अंतर्गत नोटीस पाठवण्यात आली आहे. तसेच पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधला आहे. संभाजी भिडे यांनी नोटीस स्वीकारली आहे. याप्रकरणी त्यांची चौकशी होईल.

Pankaja Munde
Pankaja Munde : बीड जिल्ह्यातील तणावाच्या परिस्थितीवर पंकजा मुंडेंचं मोठं विधान; म्हणाल्या, “मी गृहमंत्र्यांशी…”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Manoj Jarange On Dhananjay Munde
Manoj Jarange : ‘धनंजय मुंडे सरकारवरील डाग, त्यांच्या गुंडाची टोळी थांबवा, अन्यथा आम्ही…’, मनोज जरांगेंचा मोठा इशारा
Satej Patil On Municipal Elections 2025
Satej Patil : आगामी महापालिकेच्या निवडणुका काँग्रेस स्वतंत्र लढणार की आघाडीत? सतेज पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, “शक्य असेल तिथे…”
भाजपा आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडेंना लक्ष्य का करत आहेत? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : भाजपा आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडेंना लक्ष्य का करत आहेत?
Vijay Wadettiwar On Thackeray group
Vijay Wadettiwar : “आम्ही उद्धव ठाकरेंना विनंती करू, अन्यथा…”, ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेवर विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान
Rohit Pawar On Ajit Pawar group
Rohit Pawar : अजित पवार गटाकडून शरद पवारांच्या खासदारांना ‘ऑफर’? रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “अधिवेशन होतं तेव्हा…”
loksatta readers feedback
लोकमानस: साम्राज्य उभे करण्यासाठी निधीचा वापर

देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं, संभाजी भिडे यांच्या अमरावतीतल्या सभेचा व्हिडीओ उपलब्ध नाही. समाजमाध्यमांवर जे व्हिडीओ फिरत आहेत, त्याचे व्हॉईस सॅम्पल्स तपासले जातील आणि याप्रकरणी कारवाई होईल.

हे ही वाचा >> नितीन देसाईंनी आत्महत्या का केली? सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले…

दरम्यान, संभाजी भिडे यांच्याबद्दल विधानसभेत निवेदन देत असताना देवेंद्र फडणवीस हे सतत संभाजी भिडे गुरुजी असा उल्लेख करत होते. यावर विरोधकांनी आक्षेप घेतला. विरोधी बाकावरील आमदार फडणवीसांना म्हणाले, तुम्ही त्यांना गुरुजी का म्हणता? त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, कारण, आम्हाला ते गुरुजी वाटतात. तुम्हाला काय अडचण आहे? त्यांचं नाव भिडे गुरुजी आहे.

Story img Loader