कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वेळेत शासकीय मदत मिळावी यासाठी तातडीने पंचनामे पूर्ण करा, असे आदेश संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले आहेत.
तालुक्यातील शिरसगाव व परिसरातील नुकसानग्रस्त शेतीची त्यांनी पाहणी केली. तालुक्यातील शिरसगावसह गोंधवणी, हरेगाव, मुठेवाडगाव, माळवाडगाव, खानापूर आदी भागांचा कृषिमंत्री विखे यांनी दौरा केला. या वेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे, जी. के. पाटील, बाबासाहेब दिघे, भाऊसाहेब पवार होते. शिरगाव येथे त्यांनी कृषी व महसूल खात्याच्या कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. नुकसानग्रस्त सर्व पिकांचे वेळेत पंचनामे सादर करा. शासन स्तरावर जास्तीतजास्त मदत मिळण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
कृषी अधिकारी झेड. एच. पटेल व कामगार तलाठी जनार्दन ओहोळ यांनी भागातील नुकसानीची माहिती दिली. शिरसगाव परिसरातील ५५५ शेतकऱ्यांचे ५४२ हेक्टर क्षेत्रावरील पिके उद्ध्वस्त झाली तर ब्राह्मणगाव १९६ शेतकऱ्यांचे १७६ हेक्टर पिकांचे पंचनामे पूर्ण झाले. त्यात गहू, हरभरा, ऊस, चारापिके, फळबागा, भाजीपाला आदी पिकांचा समावेश असल्याचे त्यांनी कृषिमंत्री विखे यांना सांगितले.
गारपिटीचे पंचनामे वेळेत संपवण्याचे आदेश
कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वेळेत शासकीय मदत मिळावी यासाठी तातडीने पंचनामे पूर्ण करा, असे आदेश संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 19-03-2014 at 03:00 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Order of hail post mortem bring to close in time