उस्मानाबाद जिल्ह्यातील तामलवाडी येथील ऑक्सिजन भरून देणार्या केंद्राला होत असलेला पुरवठा मोठ्या प्रमाणात घटला आहे. पूर्वी दररोज दहा टन द्रव रूपातील ऑक्सिजन प्राप्त होत. मागील एप्रिलपासून हा पुरवठा पाच टनांवर आला आहे. पुणे जिल्ह्यातील चाकण येथून नऊ तासांत द्रव रूपातील ऑक्सिजन तामलवाडीत पोहोचतो. दोन तासांत मोठ्या सिलेंडरमध्ये भरून ४५ मिनिटांचा प्रवास करून तो रुग्णालयांपर्यंत पोहोचतो. मात्र रिकामे सिलिंडर परत या केंद्रावर जाण्यासाठी सहा तासांहून अधिक वेळ लागत आहे. व्यवस्थापनातील ढिसाळपणामुळे रिकामे सिलिंडर उपलब्ध होत नाहीत. परिणामी जलदगतीने ऑक्सिजन सिलिंडरचा पुढचा टप्पा प्राप्त होण्यास विलंब होत आहे. पुढील दोन महिन्यांत रूग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ होईल, असा जिल्हा प्रशासनाचा अंदाज आहे. एकीकडे ऑक्सिजनचा तुटवडा आणि दुसरीकडे रूग्णसंख्या वाढीचा आलेख पाहता, पुढील दोन महिने अधिक जिकिरीचे जाणार, असे चित्र आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा