राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल(बुधवार) एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केले. “आपल्या पंतप्रधानांच्या डोक्यात एखाद्या संगणकापेक्षाही जलदगतीने विचार येतात.” असं कोश्यारी यांनी म्हटलं आहे. त्यांचे हे विधान आता पुन्हा चर्चेत आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कार्यक्रमातील भाषणात कोश्यारी म्हणाले, “आपण सर्वजण भारतीय आहोत आणि आपण सर्वजण विश्वासावर चालतो. आपण जे काम करतोय ते किती कौशल्यपूर्ण करतोय, त्याला योगा म्हणतात. मला असं वाटतं आपले पंतप्रधान हे स्वत: योगी आहेत, ते योगाचा अभ्यास करतात. आपल्या पंतप्रधानांच्या डोक्यात एखाद्या संगणकापेक्षा थोडे जास्तच जलदगतीने विचार येतात. त्यांनी पंतप्रधान झाल्याच्या वर्षभराच्या आतच कौशल्य विकास मंत्रालय सुरू केले. ही एक मोठी गोष्ट आहे. इतक्या वर्षांमध्ये कोणीच विचार केला नाही आणि त्यांनी हा विषय हाती घेतला. कारण, आपण सर्वजण विज्ञान, कला आणि वाणिज्य शाखांचे शिक्षण घेतो. परंतु आपण रोजगार कसा मिळवू शकतो, आपण कशाप्रकारे रोजगार देऊ शकतो. यासाठी त्यांनी प्रयत्न केला की देशात अधिक प्रमाणात कौशल्य विकासाला चालना मिळेल.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Our prime ministers head thinks faster than a computer bhagat singh koshyari msr