सांगली : खून प्रकरणी जामीनावर कारागृहाबाहेर असलेला नामचीन गुंड सच्या उर्फ सचिन टारझन याचा सोमवारी सकाळी अहिल्यानगर येथे खून झाला. एका महिलेच्या घरी मुक्कामासाठी आला असताना त्याच्यावर धारदार हत्याराने हल्ला करण्यात आला. पोलीस दप्तरी गुन्हेगार म्हणून नोंद असलेल्या सच्या टारझनवर अज्ञाताने हल्ला केला. यात तो गंभीर जखमी झाला.
उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. कुपवाड पोलीसांनी संशयिताला ताब्यात घेतले आहे. गुंड दाद्या सावंत खून प्रकरणी तो संशयित होता. खूनाचा प्रकार अनैतिक संबंधातून झाल्याची प्राथमिक माहिती चर्चेतून मिळाली. या घटनेमुळे सांगलीत खळबळ माजली आहे.