तुळजापुरात मागासवर्गीय मुलीवर अत्याचार प्रकरण ताजे असतानाच परंडा तालुक्यातील कंडारी येथेही दलित समाजाच्या अल्पवयीन मुलीवर गावातीलच नराधमाने अत्याचार केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. लग्नाचे आमिष दाखवून या मुलीवर गेल्या तीन महिन्यांपासून अत्याचार करणाऱ्या तरुणावर अंभी पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
नववीत शिकणाऱ्या या मुलीवर (वय १५) गावातीलच विजय सुभाष कदम याने आमिष दाखवून तीन महिन्यांपासून अत्याचार केले. पोटात दुखू लागल्याने तिला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले असता, ही मुलगी गरोदर असल्याचे उघडकीस आले. मुलीच्या फिर्यादीवरून आरोपी कदमविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला.
दरम्यान, पीडित मुलीने पोलीस ठाण्यात दिलेली फिर्याद पोलिसांनी बदलली. अत्याचार करणाऱ्या तरुणास त्याच्या आई-वडिलांनी मदत केली. त्यांच्यावर गुन्हा नोंदवावा, अशी तक्रार या मुलीने पोलिसांत दिली होती. या प्रकरणातील सर्व आरोपींवर गुन्हे दाखल करावेत, अन्यथा रिपाइंच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रदेश चिटणीस संजय बनसोडे यांनी शनिवारी पत्रकार बैठकीत दिला. रिपाइंचे अर्जुन िशदे, पीडित मुलगी व तिचे आई-वडील उपस्थित होते.

Story img Loader