Padma Awards 2025 Maharashtra : केंद्र सरकारने शनिवारी (२५ जानेवारी) प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली. याद्वारे विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या दिग्गजांचा सन्मान करण्यात आला आहे. या पुरस्कारांमध्ये देशातील विविध ठिकाणी आणि विविध क्षेत्रात काम करणाऱ्या दिग्गजांचा समावेश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केलेल्या भाषणानंतर या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रपतींनी एकूण १३९ जणांची यादी जाहीर केली असून त्यामध्ये सात दिग्गजांना पद्म विभूषण, १९ दिग्गजांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर केला आहे. तर, ११३ जणांना पद्मश्री पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. दरम्यान, या १३९ दिग्गजांच्या यादीत महाराष्ट्रातील १४ जणांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील तीन दिग्गजांना पद्मभूषण व ११ दिग्गजांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या पुरस्कारामध्ये महाराष्ट्रातील मारूती चित्तमपल्ली, होमिओपॅथी चिकित्सक डॉ. विलास डांगरे यांचा समावेश आहे. तसेच शैली होळकर, डॉ.नीरजा भाटला, भीमसिंह भावेश, थविल वादक पी.दत्चनमूर्ती, शेखा एजे अल सबा, एल हँगथिंग, भैरूसिंग चौहान, जगदीश जोशीला, सेनानी लिबिया लोबो सरदेसाई, हरविंदर सिंग यांना देखील पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

डॉ.विलास डांगरे हे होमिओपॅथिक डॉक्टर आहेत. त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून वैद्यकीय सेवा देत आहेत. त्यांनी आतापर्यंत जवळपास एक लाखांपेक्षा जास्त रुग्णांवर उपचार केले आहेत. ते गरीब आणि सर्वसामान्य रुग्णांवर उपचार करतात. त्याचबरोबर मारुती चितमपल्ली यांनाही पद्मश्री जाहीर झाला आहे. मारुती चितमपल्ली हे ज्येष्ठ साहित्यिक आहेत. त्याचबरोबर, चैतराम पवार यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. ते वन आणि वन्यजीवाच्या संवर्धनासाठी काम करतात.

तीन दिग्गजांना पद्मभूषण पुरस्कार

पद्मभूषण
1मनोहर जोशीमरणोत्तर
2⁠पंकज उधासमरणोत्तर
3⁠शेखर कपूरकला

११ जणांना पद्मश्री पुरस्कार

पद्मश्रीक्षेत्र
1अच्युत पालवकला
2अरुंधती भट्टाचार्यव्यापार आणि उद्योग
3⁠अशोक सराफकला
4अश्विनी भिडे देशपांडेकला
5चैतराम देवचंद पवारसमाजसेवा
6जसपिंदर नरुलागायिका
7मारुती चितमपल्लीसाहित्य आणि शिक्षण
8⁠राजेंद्र मुजुमदारकला
9 सुभाष शर्माकृषी
10 वासुदेव कामतकला
11⁠डॉ. विलास डांगरेवैद्यकीय सेवा

दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांचा सन्मान

मागच्या वर्षी अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. या वर्षी जानेवारी महिना संपताना अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Padma awards 2025 full list of padma vibhushan padma bhushan padma shri awardees from maharashtra asc