वाई :आपल्या देशातील तरुण मुलांपर्यंत आपल्या खऱ्या संस्कृतीचे वाङ्मय पोहोचावयास हवे त्यासाठी नवीन डिजिटल तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करणे आवश्यक आहे. अन्यथा ही सर्व संस्कृती पुस्तकात किंवा कपाटात बंद होईल. त्यांचा वापर व्यवहारात केला गेला नाही, तर देश प्रगतीपथावर जाण्यासाठी आवश्यक पूर्वतयारी कशी करेल ? असे मत पद्मश्री अरविंद गुप्ता यांनी येथे व्यक्त केले.
हेही वाचा >>> उदय सामंत यांना रक्ताने पत्र लिहून विनंती; रोहित पवारांनी शेअर केला फोटो; म्हणाले, “घोर अन्याय..”
येथील प्राज्ञपाठशाळा मंडळाच्या कार्यालयास श्री.गुप्ता यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. गुप्ता हे वैज्ञानिक खेळणी तयार करण्यामध्ये निष्णात असून त्यांनी वाई येथे आल्यानंतर प्राज्ञपाठशाळा मंडळाच्या कार्यालयास भेट देऊन येथे सुरू असणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती घेतली. संस्थेमध्ये ६०० वर्षांपूर्वीच्या संस्कृत भाषेतील हस्तलिखित पोथ्यांचा संग्रह असून त्यांच्या आधारे ‘धर्मकोशा’ची निर्मिती करण्यात येथे ही गोष्ट स्पष्ट होताच श्री. गुप्ता म्हणाले, ‘धर्म माणसाच्या दैनंदिन व्यवहारावर मोठा परिणाम करत असतो. आहार-विहार, धार्मिक स्थळांच्या रचना इतकेच नव्हे तर खूप वेगवेगळ्या प्रकारची खाद्यसंस्कृती ही संस्कृतीशी निगडीत असते. त्यामुळे देवधर्म न मानणाऱ्या अथवा नास्तिक असणाऱ्या लोकांनी या गोष्टींचा विचार केलेला नाही तर ते एका विशिष्ट प्रकारच्या आनंदालाही मुकलेले आहेत. ‘
हेही वाचा >>> Jaipur Mumbai Express Firing: “चेतनचा गोळीबार पाहून मला कसाब..”, प्रत्यक्षदर्शीने सांगितला ‘तो’ भयानक अनुभव
यानंतर गुप्ता म्हणाले,जुन्या प्रथा व परंपरा या सर्वच त्याज्य न मानता अथवा त्यांचा अनावश्यक आग्रह न धरता व नवीन प्रथा व परंपरा सर्वच्या सर्व न स्वीकारता योग्य व चांगले स्वीकारून कालानुरूप त्यामध्ये बदल केला जाणे आवश्यक आहे. अन्यथा जीवन निरस व जड होईल, असेही मत त्यांनी व्यक्त केले. श्री. गुप्ता यांचा शाल व श्रीफळ देऊन संस्थेचे सचिव अनिल जोशी यांनी सन्मान केला. यावेळी सहसचिव भालचंद्र मोने व संचालक नंदकुमार बागवडे हे उपस्थित होते.