महाराष्ट्राच्या मातीतील पारंपरिक क्रीडा प्रकार म्हणजे मल्लखांब. काळानुरूप महत्त्व कमी झालेल्या या खेळाला नव संजीवनी देण्याचं काम उदय देशपांडे यांनी केलं. गेली ५० वर्ष राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मल्लखांबचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम उदय देशपांडे करत आहेत.
पन्नासहून अधिक देशांना त्यांनी या खेळाकडे वळवलं. शिवाय जागतिक स्तरावरील पाच हजार मुलांना त्यांनी मल्लखांबची गोडी लावली. मल्लखांबसाठी त्यांनी दिलेल्या या योगदानाचा सन्मान नुकताच पद्मश्री पुरस्कारानेही करण्यात आला आहे. त्यांचा हा असामान्य प्रवास नक्की पाहा.