निवडणूक आयोगाचा ससेमिरा टाळण्यासाठी आचारसंहितेच्या आधीच राज्यातील बहुतांश वृत्तपत्रांनी ‘पेडन्यूज’चा धमाका सुरू केला असून या वृत्तपत्रांचे कर्तेधर्ते आकर्षक ‘पॅकेज’ घेऊन संभाव्य उमेदवारांचे उंबरठे झिजवत आहेत. या पॅकेजच्या नादात एका हिंदी वृत्तपत्राने आपल्या वाचकांना चक्क मतदार म्हणून उमेदवारांसमोर सादर केले आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत ‘अशोकपर्व’च्या निमित्ताने ‘पेडन्यूज’ प्रकरणाने कळस गाठला होता. त्याची गंभीर दखल घेऊन निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीत पेडन्यूजवर नजर ठेवण्यासाठी विशेष समिती नेमली होती. या समितीने राज्यातील काही वृत्तपत्रांना, तसेच अनेक उमेदवारांनाही दोषी ठरवले. यातून होणारी बदनामी टाळण्यासाठी आता राज्यातील प्रमुख वृत्तपत्रांनी (लोकसत्ता नाही) विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शक्कल लढविली आहे.
आचारसंहिता लागण्यापूर्वीच या वृत्तपत्रांनी ‘पेडन्यूज’चा प्रकार सुरू केला आहे. काही वृत्तपत्रांनी बातमीच्या स्वरूपात संभाव्य उमेदवारांच्या कार्याचा आढावा घेणारी पानेच्या पाने प्रसिद्ध करणे सुरू केले आहे. प्रत्येक मतदारसंघासाठी दीड ते अडीच लाखाचा दर या विशेष पानांसाठी निश्चित करण्यात आला आहे. एका प्रमुख वृत्तपत्राने संभाव्य उमेदवारांशी संबंधित बातम्यांवर पूर्णपणे बंदी घातली आहे. कॉलम सेंटिमीटरच्या हिशेबाने पैसे मोजल्यावरच बातमी प्रकाशित केली जाईल, असे आदेश सर्व संबंधितांना देण्यात आले आहेत. आचारसंहिता लागण्यास काहीच दिवस शिल्लक असल्याने सध्या सर्वत्र राजकीय कार्यक्रम, उद्घाटन, भूमिपूजनांची रेलचेल आहे. या बातम्या पैसे मोजल्यावरच प्रकाशित केल्या जात आहेत. त्यामुळे अनेक आमदार व उमेदवार वैतागले आहेत.
आचारसंहितेआधीच ‘पेड न्यूज पर्व’!
निवडणूक आयोगाचा ससेमिरा टाळण्यासाठी आचारसंहितेच्या आधीच राज्यातील बहुतांश वृत्तपत्रांनी ‘पेडन्यूज’चा धमाका सुरू केला असून या वृत्तपत्रांचे कर्तेधर्ते आकर्षक ‘पॅकेज’ घेऊन संभाव्य उमेदवारांचे उंबरठे झिजवत आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 27-08-2014 at 03:10 IST
TOPICSआचारसंहिता
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paid news feast hits major newspapers