कर्जत येथील ग्रामदैवत संत सद्गुरू गोदड महाराज यांच्या १८७ व्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचा आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याची सांगता पालखी उत्सवाने झाली. रात्री आठ वाजता मंदिरामधून भगवान विष्णू या देवाची मूर्ती पालखीमध्ये मंदिराच्या बाहेर नगर प्रदक्षिणेसाठी नेण्यात आली होती. कर्जत शहरांमधून रात्रभर ही पालखी नगर प्रदक्षिणा करून पहाटे सहा वाजता मंदिरामध्ये येते. सडा रांगोळ्या काढून फटाके फोडून व प्रत्येकाच्या दारामध्ये पालखी आल्यानंतर भक्ती भावाने ओवाळण्यात आले. मोठ्या संख्येने भावीक या सोहळ्यामध्ये सहभागी झाले . पालखीच्या अग्रभागी भजनी मंडळ होते. भजन गवळणी गात हा सुंदर सोहळा संपन्न झाला. संत गोदड महाराजांच्या गजराने कर्जत शहर दुमदुमून गेले होते. या हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने शहरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचा आयोजन करण्यात आले होते. प्रवचन, कीर्तन, हरिपाठ, विष्णुसहस्रनाम, संत गोदड महाराज यांचे चरित्र वाचन, याच प्रमाणे श्रीराम कथा याचे आयोजन करण्यात आले होते. हजारो भाविकांनी याचा लाभ घेतला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा