शिवसेना पक्षातून पालघर मतदारसंघात हॅट्रिक साधलेल्या पालघरच्या माजी आमदार व राज्यमंत्री मनीषा निमकर यांनी भाजपात प्रवेश केला आहे. मनीषा निमकर यांनी बहुजन विकास आघाडीला सोडचिठ्ठी देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. जव्हार येथील प्रचारसभेत हा पक्षप्रवेश पार पडला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सन १९९५, १९९९ आणि २००४ या विधानसभेच्या तीन निवडणुकांमध्ये पालघर मधून विजयी झालेल्या मनीषा निमकर यांचा २००९ मध्ये शिवसेनेत बंडखोरी झाल्याने पराभव झाला होता. काही वर्षांनंतर त्यांनी बहुजन विकास आघाडी प्रवेश केला. बहुजन विकास आघाडीतर्फे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत तसेच २०१६ मध्ये झालेल्या पालघर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत मनीषा निमकर यांनी बहुजन विकास आघाडीतर्फे निवडणूक लढवली होती. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्या बहुजन विकास आघाडीकडून बोईसर येथून त्याचप्रमाणे सर्वपक्षीय पाठिंब्यावर पालघर येथून निवडणूक लढविण्यास इच्छुक होत्या. मात्र या दोन्ही मतदारसंघात उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी डहाणू मतदारसंघात भाजपाचे काम सुरू केले होते. अखेर त्यांनी अधिकृतपणे भाजपात प्रवेश केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Palghar former mla manisha nimkar joins bjp maharashtra assembly election sgy